Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

21 व्या गुंफण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुनंदा शेळके

सातारा / प्रतिनिधी : पुणे येथे पुढील महिन्यात होणार्‍या 21 व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयसिंगपूर येथील प्रसिध्द कवयित्री

महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी महाविकास आघाडीस ताकद द्या : आ. जयंत पाटील
राजारामबापू कारखाना निवडणूक बिनविरोध; संचालक मंडळात 14 नवे चेहरे
बेकायदेशीर सावकारी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल

सातारा / प्रतिनिधी : पुणे येथे पुढील महिन्यात होणार्‍या 21 व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयसिंगपूर येथील प्रसिध्द कवयित्री व गझलकार डॉ. सुनंदा शेळके यांची निवड झाली आहे. गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्‍वर चेणगे यांनी ही माहिती दिली.
साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळींचे व्यासपीठ म्हणून परिचित असलेल्या सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व भारतीय शिक्षण संस्था (कोथरूड, पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात हे साहित्य संमेलन होत आहे. अकादमीच्या विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुनंदा शेळके यांची निवड करण्यात आली. डॉ. बसवेश्‍वर चेणगे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

COMMENTS