Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. भास्कर मोरेला अटक करण्याची पोलिसांनी कृती करावी

आमदार प्रा. राम शिंदे ; मुला-मुलींच्या पाठीशी असल्याची ग्वाही

जामखेड ः मी शिक्षक पेशातून आलो आहे, विद्यार्थी-शिक्षक नातं जाणतो. डॉ भास्कर मोरेने अत्यंत गैरमार्गाने मुलामुलींना वागणूक दिली आहे. त्याच्यावर मुल

कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
एकही पात्र लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहणार नाही

जामखेड ः मी शिक्षक पेशातून आलो आहे, विद्यार्थी-शिक्षक नातं जाणतो. डॉ भास्कर मोरेने अत्यंत गैरमार्गाने मुलामुलींना वागणूक दिली आहे. त्याच्यावर मुलींच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा तसेच हरीण पाळल्याचाही वनविभागाचा गुन्हा दाखल आहे. अकरा दिवस झाले आंदोलन उपोषण चालू आहे. पोलिसांनी आता लवकर अटक करण्याची कृती करावी. मी मुलामुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली आहे. आमदार शिंदे यांनी आंदोलनकर्ते मुल-मुली आणि उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आ राम शिंदे यांनी फोनवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बोलून घटनेचे गांभीर्य सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे पोलीस, निरीक्षक महेश पाटील, डॉ भगवान मुरुमकर, सुनिल साळवे, रवि सुरवसे, अमित चिंतामणी, मनोज राजगुरू, बाजीराव गोपाळघरे, पवन राळेभात, डॉ अल्ताफ शेख, प्रविण चोरडिया, प्रदिप टापरे, संपत राळेभात, शेकडा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रा. शिंदे पुढे म्हणाले की, मागील गून्हयातील इट्रिम जामीन रद्द करण्याची प्रक्रिया व बंदूक परवाना रद्द करण्यास पोलिसांना सांगितले आहे. मुला-मुलींनी आपली तक्रार लेखी कागदावर दिली पाहिजे. पोलीस प्रशासन निश्‍चित दखल घेईल. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थींनी सहभागी असलेले पहिले आंदोलन आहे. त्यांच्या करिअर आणि शिक्षणाला धक्का लागणार नाही. याची ग्वाही देतो असे सांगितले.

संचालक मंडळ कुठे आहे ? – रत्नदीप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे व संस्थेवर गंभीर आरोप झाले मात्र रत्नदीप संस्थेचे इतर संचालक मंडळ कोण आहे? कुठे आहे? हे कोणालाच माहीत नाही. ते पूढे का येत नाही हा मोठा प्रश्‍न आहे.

मुलींनी आणखी किती रडवणार ? – रत्नदीपच्या मुली अकरा दिवसांपासून त्यांच्याबाबत घडलेल्या अन्यायाच्या घटना ओरडुन रडून सांगत आहेत. ऐकणार्‍यांना ग्लानी येते, चीड निर्माण होते. मात्र संबधित आधिकारी व रोज ऐकूण जाणार्‍या नेत्यांना चीड का येत नाही. रोजच रडून सांगण्याची मुलींनाही ग्लानी येते. या मुलींना आणखी कीती दिवस रडवणार आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलिसांवर कुणाचे प्रेशर ? – आमदार रोहित पवार, आ. प्रा. राम शिंदे, महिला आयोगाच्या सदस्या, वरिष्ठ अधिकारी अनेकांना आंदोलनकर्त्यां मुली व उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांना भेट दिली कारवाई करण्याचे आदेश दिले आश्‍वासन दिले. आज गुरूवारी खासदार सुजय विखे येतील तेही कारवाईच करण्याचे सांगतील. सरकारमधले, विरोधक सर्वच कारवाई करा म्हणतात मग पोलिस डॉ. भास्कर मोरेंना शोधू का शकले नाही ? अनेक पथके मागावर असल्याचे सांगण्यात येत असले तरी, मोरेंचा ठावठिकाणा पोलिस शोधू शकलेले नाहीत.

COMMENTS