Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. कुमार सप्तर्षी यांना मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना पुरस्कार प्रदान

कर्जत/प्रतिनिधी ः नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्

धर्मवीर संभाजीराजे शक्तीज्योत शौैर्य यात्रा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिर्डी येथे भव्य छायाचित्र प्रदर्शनास सुरूवात
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे गरजेचे- रणजीतसिंह डिसले

कर्जत/प्रतिनिधी ः नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दलाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रदान करण्यात आला. प्रसाद बन वाड्मय पुरस्कार पोपट काळे यांना ‘काजवा’ या आत्मकथनासाठी प्रदान करण्यात आला. प्रत्येकी 11 हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. ज्येष्ठ सिनेकलावंत डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी कोथरुड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे हे 22 वे वर्ष असून यंदा पहिल्यांदाच पुण्यात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. खा. सुप्रिया सुळे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाआधी डॉ. सप्तर्षी यांना शुभेच्छा दिल्या.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, वाड्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत तसेच संजीव कुळकर्णी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, प्रवीण सप्तर्षी, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, काँटिनेंटल प्रकाशनच्या अमृता कुलकर्णी, लिज्जतचे मार्गदर्शक सुरेश कोते आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मोहन आगाशे म्हणाले, ‘सप्तर्षी यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते कुणावरही आपले मत लादत नाहीत, तर एखाद्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या सर्व बाजू अभ्यासपूर्ण आणि विश्‍लेषण करून मांडतात, समजावून सांगतात. त्यामुळेच त्यांचे मुद्दे ऐकणार्‍याला पटतात व त्यांच्याकडे अनेक अनुयायी आकर्षित होतात. दर्जेदार साहित्य हाच शिक्षणाचा मुलभूत पाया असतो. पाठ्यपुस्तकापेक्षाही आपल्याला ही जीवनानुभव देणारी पुस्तके अधिक समुद्र, आणि संस्कारक्षम बनवतात. लेखक आणि कवींच्या संगतीत राहिल्याने आपले जीवन अधिक समृद्ध आणि सृजनशील होवू शकते, अशी संधी ज्याने त्याने शोधली पाहिजे. डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘लोकशाहीत लोकांना स्वतःच शहाणं व्हावे लागते, हे खरं असलं तरी काही वेळा लोकांना थापा ऐकण्याची इतकी सवय झालेली असते की, अदानीबद्दल केजरीवाल यांनी कितीही प्रश्‍न विचारले तरी पंतप्रधान मोदी उत्तरच देत नाहीत, उलट वेगवेगळ्या थापाच मारतात आणि लोकांना त्या ऐकण्यात मजा वाटते. लोकांना सत्य ऐकण्यात रस नाही. मोदी यांना पुन्हा निवडून दिल्यास सत्य बोलणारे तुरुंगात दिसतील आणि खोटं बोलणारे बाहेर किंवा सत्तेत असतील. सत्ता हे भ्रष्टाचाराचं स्थान आहे असं आपल्याला खोटं सांगितलं जातं, खरंतर ज्या आमदारांच्या मनात भ्रष्टाचार करायची भावना असते तेच भ्रष्टाचार करतात, ज्याला इमानदारीने राहायचे तो सत्तेतही इमानदार राहू शकतो. पूर्वी फक्त काही मोजके लोक लेखन करीत असत, आता सोशल मीडियामुळे ही संधी सर्व सामान्य लोकांना मिळू लागली आहे, ही अमूल्य संधी मानून, सर्वांनी आपल्या मनातील भावना, जीवनानुभव लिहिण्याची आवश्यकता आहे. युरोपीय देशांत अगदी पूर्वीपासून अगदी छोट्या छोट्या अनुभवांवर प्रचंड लेखन होते, आणि त्याची पुस्तकेही प्रकाशित होतात. सुरेश सावंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. प्रास्ताविक डॉ. अच्युत बन यांनी केले. संजीव कुळकर्णी यांनी सप्तर्षी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. पोपट काळे यांनी जीवनातील विविध अनुभवांचे कथन केले.

COMMENTS