कोपरगाव प्रतिनिधी ः गेल्या 25 वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात श्रद्धा हॉस्पिटलद्वारे अहोरात्र रुग्णांना सेवा देणारे डॉ विजय दादाह
कोपरगाव प्रतिनिधी ः गेल्या 25 वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात श्रद्धा हॉस्पिटलद्वारे अहोरात्र रुग्णांना सेवा देणारे डॉ विजय दादाहरी काळे हे आपली आई छबुबाई दादाहारी काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक बांधिलकी जोपासत आपण देखील समाजाचे काही तरी देणे लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत 24 जानेवारी 2023 पासून प्रत्येक मंगळवारी परिसरातील वय वर्ष 60 च्या पुढील जेष्ठ नागरिकांची मोफत तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन करणार असल्याने डॉ काळे यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मकरसंक्रातीच्या दिवशी आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या जेष्ठ महिलांचे आशीर्वाद घेत शिंगणापूरचे लोकनियुक्त सरपंच डॉ विजय काळे यांनी ही घोषणा करतांना सांगितले की, माझ्या आईने काबाड कष्ट करत आह्मा भावंडाना उच्चशिक्षित करत समाजात मानाचे स्थान मिळवून दिले तिचे हे ऋण आह्मी कधीच फेडू शकत नाही पण तिच्या या ऋणाची उतराई म्हणून सध्या वातावरण बदलामुळे अनेक जेष्ठ नागरिक विविध शारीरिक व्याधीनी त्रस्त असून अशातच कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, शारीरिक, अशा अनेक समस्यांनी देखील भरपूर कुटूंबातील जेष्ठ नागरिक त्रस्त असल्याचे पहावयास मिळत असल्याने आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. या उद्देशाने आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवार दि 24 जानेवारी पासून दर मंगळवारी 11 ते 2 या वेळेत परीसरातील वय वर्ष 60 च्या पुढील जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करणार असल्याचे सांगत या संधीचा जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ काळे यांनी करत या उतारवयात प्रत्येक जेष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करत उपस्थित सर्व जेष्ठ महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. या प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्या राजश्री काळे यांच्यासह छाया काळे, प्रभा संवत्सरकर, कमळा संवत्सरकर, मैना आढाव, बबाई काळे, अंजना इंगळे, द्वारका इंगळे, आशा चव्हाण, सुंदरा संवत्सरकर आदी जेष्ठ महिला उपस्थित होत्या.
COMMENTS