Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या डॉक्टर सेल च्या जिल्हाध्यक्षपदी डॉ कैलास गवई  

बुलडाणा प्रतिनीधी - बुलडाणा येथील डॉ कैलास तुकाराम गवई प्रसिद्ध दंत रोग चिकित्सक व सर्जन (आर के दातांचा दवाखाना) संगम चौक बुलडाणा यांची अखिल भारत

निलेश राणेंना पुणे महापालिकेकडून दिलासा
कोरोनापेक्षाही येणार घातक महामारी
शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

बुलडाणा प्रतिनीधी – बुलडाणा येथील डॉ कैलास तुकाराम गवई प्रसिद्ध दंत रोग चिकित्सक व सर्जन (आर के दातांचा दवाखाना) संगम चौक बुलडाणा यांची अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या डॉक्टर सेल च्या जिल्हा अध्यक्षपदी  संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंजि. डी टी शिपणे, युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे.या वेळी राज्य उपाध्यक्ष के. एम .वैरी,इंजि.अशोक भोसले, विदर्भ अध्यक्ष शरद खरात,जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष इंजि.शिवाजी जोहरे, जिल्हा उपाध्यक्ष भिमसिंग शिंगणे, युवा संयोजक प्रमोद माळी यांची प्रमुख उपस्थिती होती . डॉ कैलास गवई हे बुलडाणा जिल्ह्यातले पहिले म्याकझियलो फेशिअल सर्जन असून ते जळगाव, बुलडाणा,जालना, परभणी, हिंगोली, वसीम आदिसह विविध जिल्ह्यात आपली सेवा देतात, वैद्यकीय क्षेत्रात एक नामवंत सर्जन म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचा जिल्ह्यासह जवळपास संपूर्ण महाराष्ट्र भर त्यांची ओळख आहे. त्यामूळे संघटनेत एक प्रभावी, मितभाषी बहुआयामी व्यक्तिमत्त्व मिळाले त्यांच्या जनसंपर्काचा संगटनेला मोठा फायदा होईल अशी ग्वाही पुरुषोत्तम बोर्डे यांनी दिली, तसेच त्यांची डॉक्टर सेल च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वच जनसमुदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर डॉ कैलाश गवई हे लवकरच वैद्यकिय विभागाची कार्यकारीणी गठित करुन समाज उपयोगी आरोग्य शिबिर आयोजित करुन विविध आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली व माझ्यावर दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडेल असेही डॉ गवई म्हणाले त्यामूळे संघटनेत नव चैतन्य निर्माण झाले आहे. डॉ कैलाश गवई साहेब यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS