Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. रामकृष्ण जगताप यांची ’श्रीरामपूर साहित्य परिषद ’अध्यक्षपदी निवड

श्रीरामपूर ः येथील बोरावकेनगरमधील राज माइंड पावर पब्लिकेशन प्रकाशनचे प्रकाशक, साहित्यिक, संमोहनतज्ज्ञ डॉ. रामकृष्ण सोन्याबापू जगताप यांची श्रीराम

आमदार थोरात यांचेसह संगमनेरकरांनी लुटला भजे पार्टीचा आनंद
बदलापूर घटनेचा राहुरीतील मुस्लिम महिलांकडून निषेध
संगमनेरमध्ये बस व मोटर सायकलचा अपघात

श्रीरामपूर ः येथील बोरावकेनगरमधील राज माइंड पावर पब्लिकेशन प्रकाशनचे प्रकाशक, साहित्यिक, संमोहनतज्ज्ञ डॉ. रामकृष्ण सोन्याबापू जगताप यांची श्रीरामपूर साहित्य परिषद अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. दिवाळी पाडवानिमित्त स्नेहभेट, साहित्यचर्चा आणि नवीन उपक्रम प्रारंभ कार्यक्रमप्रसंगी डॉ. रामकृष्ण जगताप यांच्या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, संशोधकीय कार्याचे कौतुक करून त्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते.
वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे,विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती सदस्य, पत्रकार प्रकाश कुलथे,साहित्य परिवारचे संस्थापक, अध्यक्ष कवी प्रा. पोपटराव पटारे, प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष लेविन भोसले, माजी प्राचार्य किसनराव वमने,साहित्य प्रबोधन मंचचे कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे, श्रद्धा कुलथे, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील, पत्रकार, कवी राजेंद्र देसाई, कवी, गीतकार बाबासाहेब पवार, कवयित्री संगीता फासाटे, प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, माजी प्राचार्य शन्करराव अनारसे, प्रा. शिवाजीराव बारगळ, आरोग्यमित्र भीमराज बागुल, पत्रकार बाबासाहेब चेडे, भूमी फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. कैलास पवार, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, आसरा खजिनदार मंदाकिनी उपाध्ये, सचिव आरती उपाध्ये,आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका मोहिनी काळे,साहित्य परिवारच्या खजिनदार सुनीताताई पटारे, स्नेहप्रकाश प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. स्नेहलता कुलथे, उज्ज्वला जगताप, राज माइंड पावर पब्लिकेशनचे कार्याध्यक्ष सूरज जगताप, सचिव डॉ. भक्ती जगताप आदिंच्या सहभागातून आणि संवादातून ही निवड करण्यात आली. श्रीरामपूर ही साहित्य पंढरी असून या शहरातील मान्यवर, नवोदित, ग्रामीण, शहरी साहित्यिकांना पाठबळ देण्याचे कार्य, ना नफा ना तोटा या तत्वावर पुस्तक प्रकाशन, साहित्य संमेलन, कविसंमेलन, साहित्य प्रकार, प्रवाह परिसंवाद, साहित्य संशोधन आणि मार्गदर्शन कार्यशाळा, विद्यार्थी सहभाग आणि विविध उपक्रमातून उगवत्या पिढीला वाचन, लेखन, चिंतन, संस्कृती आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. लवकरच श्रीरामपूर साहित्य परिषदेची कार्यकारिणी, पदाधिकारी यांची निवड बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष डॉ. रामकृष्ण जगताप यांनी सांगितले. उपस्थितांनी डॉ. जगताप यांचा सत्कार करून या साहित्यसेवेला सर्व सहकार्य करू असे मनोगत व्यक्त केले.

COMMENTS