Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि विचार अंगीकारले पाहिजेत- डॉ.सारिकाताई क्षीरसागर

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

बीड प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  आयुष्यभर शिक्षणावर भर दिला.ते ज्ञानाचे भंडार होते. त्यांनी विचारांची लढाई लढली त्यांची शिकवण आणि विचार

रणदीप हुड्डा आणि लिन लॅशरामने लग्नानंतर दिली रिसेप्शन पार्टी
सरकारे बदलली तरीही डॉ. दाभोळकरांचे सूत्रधार मोकाट : डॉ. राजेंद्र माने
असुर फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा

बीड प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  आयुष्यभर शिक्षणावर भर दिला.ते ज्ञानाचे भंडार होते. त्यांनी विचारांची लढाई लढली त्यांची शिकवण आणि विचार अंगीकारले पाहिजेत,असे मत डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड च्या वतीने आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबीर  व रक्तदान शिबिर कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीडच्या वतीने आंबेडकर चौक,यशवंत उद्यान,पेठ बीड येथे भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.सारिकाताई क्षीरसागर ह्या प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व प्रतिमेला डॉ.सारिकाताईंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड च्या वतीने जयंतीनिमित्त अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी शेकडो नागरिक, महिला व तरुणांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच शेकडो तरुणांनी यावेळी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य बजावले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे व विचारांचे स्मरण करून उपस्थित समाज बांधव आणि भगिनींना डॉ.सारिकाताईंनी शुभेच्छा दिल्या व सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड कडून स्तुत्य उपक्रम राबविले जात असल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले. यावेळी डॉ.सारिकाताई बोलताना त्या म्हणाल्या की, आजच्या घडीला शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. डॉ.बाबासाहेबांनी देखील आपल्या पूर्ण आयुष्यात शिक्षणावर भर दिला. या शिक्षणातूनच त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था त्यांनी देशाला दिली. ते ज्ञानाचे भंडार होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सदैव ग्रंथाचे व पुस्तकांचे महत्व सांगितले.बाबासाहेबांनी विचारांची लढाई लढली आणि त्यांच्या विचारांचा विजय झाला.समाजाकडून देखील बाबासाहेबांचे विचार जपले जात आहेत,याचा आनंद वाटतोय. भारतीय स्त्री आज जे स्वातंत्र्य उपभोगत आहे, याचे श्रेय आपल्या संविधानाला व पर्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. प्रचंड स्त्रीवादी असलेले डॉ. बाबासाहेब हे स्त्रीमुक्तीचे आणि स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते होते. आजच्या पिढीने त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत असे डॉ. सारिकाताई क्षीरसागर म्हणाल्या. रक्तदान बाबत त्या म्हणाल्या की, नागरिकांनी सतत रक्तदान केले पाहिजे. रक्तदान केल्याने आपल्या शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही.आजही रक्तदानाच्या बाबतीत लोकांच्या मनात गैरसमज आहे. बहुतेक लोकांना असे वाटते की, रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो आणि नंतर अनेक रोग उद्भवु शकतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. उलट रक्तदान केल्याने समाधानच मिळते.रुग्णालयात हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना रक्ताची खूप गरज असते. मात्र रक्त नसल्यामुळे रूग्णाचा मृत्यू होतो. मात्र आपण पुढे येऊन रक्तदान करून रुग्णांचे जीव वाचवले पाहिजेत. रक्तदान ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: तरुणांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन देखील डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सव समितीचे संस्थापक अ‍ॅड.विकास जोगदंड यांनी तर संचालन आणि आभार प्रदर्शन आदर्श जोगदंड यांनी केले. याप्रसंगी जयंती उत्सव समीतीचे कार्याध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अमृत सारडा,माजी नगरसेवक शुभम धूत, राणा चौहाण,विश्वनाथ आचार्य,जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष सतपाल लाहोट, सचिव भिंगरेश जोगदंड, अशोक कांबळे, रुस्तुम बेदरे, नवनाथ गोरे, ईश्वर धनवे, अण्णाभाऊ भालेराव, रमेश वाघमारे, बाबु बनसोडे, महेश राठोड, विशाल भंडारे, मिथुन शिनगारे, राम जाधव, अमोल आहिरे,अशोक मस्के, यांच्यासह नागरिक,तसेच कमलताई जोगदंड, सारिका जोगदंड, मनीषा गायकवाड, रेखा गायकवाड, व महिलाभगिनी, समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.

COMMENTS