Homeताज्या बातम्यादेश

डॉ. आंबेडकरांचे कार्य कधीही विसरता येणार नाही : पंतप्रधान

नवी दिल्ली : भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथी- महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे स्मरण आणि अभ

मोदी मित्रांच्या खिश्यात देश घालायला निघालेत
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज नाना पटोले l DAINIK LOKMNTHAN
आवास योजनेमुळे गरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती

नवी दिल्ली : भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथी- महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे स्मरण आणि अभिवादन केले. यासंदर्भात ट्विटरवर संदेश जारी करत पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली. आपण देशाप्रती त्यांच्या आदर्श सेवेचे स्मरण करत आहोत. त्यांच्या संघर्षातून लाखो अनुयायांमध्ये आशा निर्माण झाली. भारताला एवढी व्यापक राज्यघटना देण्याचे त्यांचे प्रयत्न कधीही विसरता येणार नसल्याचे मोदींनी आपल्या संदेशात नमूद केलेय. यावेळी संसद भवन परिसरात पंतप्रधानांनी बाबासाहेबांना पुष्पांजली वाहिली.


2015 पासून, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर , भारतीय संविधान स्वीकारल्याच्या सन्मानार्थ दर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो.संसदेच्या नवीन इमारतीतील सेंट्रल कॉन्स्टिट्यूशन हॉल आणि गॅलरीतही भारतीय संविधानाचे प्रदर्शन केले जाईल.2019 मध्ये पंतप्रधान म्हणून दुसर्‍यांदा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानाला नमन केले. यापूर्वी 2011 मध्ये, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ’भारत नू संविधान’ भारताच्या राज्यघटनेची गुजराती आवृत्ती प्रसिद्ध केली होती. भारतीय राज्यघटना स्थानिक भाषेत प्रकाशित केल्याने लोकांना देशाचे कायदे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास आणि त्यातील अंतर्भूत भावना व्यक्त करण्यात मदत होईल, असा मोदींना विश्‍वास होता. राज्यघटनेला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी 2010 मध्ये संविधान गौरव यात्रेचे आयोजन केले होते. गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये एक ऐतिहासिक मिरवणूक काढली ज्याचे नेतृत्व एका हत्तीवर राज्यघटनेची विशाल प्रतिकृती होती. तसेच 1999 साली संविधानाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. आपले कर्तव्य किंवा आपले अधिकार राष्ट्राला पुढे नेऊ शकतात का यावर देशव्यापी चर्चा आवश्यक आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अन्य मान्यवरांनी केले अभिवादन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी- महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अन्य मान्यवरांसह संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण केली तसेच त्यांचे अभिवादन आणि स्मरण केले. यावेळी उपराष्ट्रपती अध्यक्ष जगदीप धनकड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री डॉ विरेंद्र कुमार, प्रल्हाद जोशी, अर्जुन राम मेघवाल, रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

COMMENTS