Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईकरांची डबल डेकर बस होणार हायटेक

मुंबई प्रतिनिधी - मुंबईकरांची लाडकी डबल डेकर बस आता 85 वर्षांची झाली आहे. 7 डिसेंबरला मुंबईच्या डबर डेकर बसचा 85 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. आत

राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ
2 भावांवर रॉड, लाठ्या-काठ्यांनी जीवघेणे हल्ला; घटना CCTVमध्ये कैद | LOK News 24
18 + साठी पुरेशा लसी आहेत का?

मुंबई प्रतिनिधी – मुंबईकरांची लाडकी डबल डेकर बस आता 85 वर्षांची झाली आहे. 7 डिसेंबरला मुंबईच्या डबर डेकर बसचा 85 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. आता नवीन वर्षात डबल डेकर बस ही नव्या स्वरुपात येणार आहे. 7 डिसेंबर 1937 साली सुरू झालेली डबल डेकर बससेवा आजही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. आता ही डबल डेकर बससेवा आणखी अ‍ॅडव्हान्स आणि हायटेक होणार आहे.


मुंबईतलीच नाही तर संपूर्ण देशातली पहिली डबल डेकर बस सेवा होती.  मुंबईत डबल डेकर बसची (दुमजली बसची) सेवा 7 डिसेंबर 1937 साली सुरू झाली होती. या सेवेला 85 वर्षे पुर्ण झाली आहेत. डबल डेकर सेवा आता अ‍ॅडव्हान्स झाली असून नवीन वर्षात नव्या रूपात ही सेवा देण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रम प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, टांगा किंवा टॅक्सीचा वापर करायचे. पण सिटी बसचा प्रवास बेस्टच्या मार्फत 1926 मध्ये सुरू झाला. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्ट या कंपनीनं सुरू केलेली ही बससेवा मुंबईतलीच नाही तर पूर्ण देशातली पहिली बस सेवा होती.  अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत पहिली बस धावली होती. नंतर सरकार आणि बीएमसीच्या आवाहनानुसार कंपनीने 1934 मध्ये मुंबईच्या उत्तर भागात आपल्या सेवेचा विस्तार केला. 1937 मध्ये डबल डेकर बस वापरात आणली गेली. मुंबई आणि देशातील पहिली मर्यादित बस सेवा 1949 मध्ये कुलाबा ते माहिम अशी चालवली गेली होती. दरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या ईलेक्ट्रिक एसी डबल डेकरला नवीन वर्षात मकरसंक्रांतीला मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्यात 50 ईलेक्ट्रिक एसी डबल डेकर मुंबईकरांच्या सेवेत चालविण्यात येणार आहेत. तर डिसेंबर 2023 पर्यत 900 ईलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत, त्यामुळे बसने प्रवास करणार्‍या मुंबईकरांना मोठा लाभ मिळणार आहे. या ईलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पुश बॅक सिट्स, सिट्स समोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित अशी लक्झरी सेवा मिळणार आहे.

COMMENTS