मुंबई/प्रतिनिधी ः केंद्र सकरारने 31 डिसेंबरपर्यंत 40 टक्के निर्यातशुल्क जाहीर केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्यानंतर सोमवारी कॅबिनेट

मुंबई/प्रतिनिधी ः केंद्र सकरारने 31 डिसेंबरपर्यंत 40 टक्के निर्यातशुल्क जाहीर केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्यानंतर सोमवारी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी कांदा परवडत नसल्यास खाऊ नका, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ’ज्याला कांदा परवडत नाही, त्यांनी 2-4 महिने कांदा खाल्ला नाही, तर काही बिघडत नाही, असे ते म्हणालेत.
केंद्राने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. त्यांनी नाशिक भागात तीव्र आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी उपरोक्त वादग्रस्त विधान केले आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांवर अन्याय होणार नाही, दर पडणार नाही, याची काळजी सरकार घेईल. शेतकर्यांना कांद्याचे दर कोसळण्याची भीती वाटत आहे. कांदे खरेदी करणार्या व्यापार्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. या भावना केंद्राच्या कानावर घातल्या जातील. त्यावर केंद्र निश्चितच सकारात्मक मार्ग काढेल. दादा भुसे पुढे म्हणाले की, अनेकदा कांद्याला 200 ते 300 भाव मिळतो. काही वेळा तो 2 हजारांपर्यंतही जातो. त्यामुळे उत्पादन व पुरवठा याचे नियोजन करावे लागते. नाशिक जिल्ह्यातील हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे नियोजन या प्रकरणी केले जाईल. दादा भुसे यांनी यावेळी संजय राऊत यांनी निवडणूक लढवण्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचाही चिमटा काढला. ते म्हणाले की, सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जनतेमध्ये गेल्यानंतर मतदार राजा काय असतो हे कळते. एसी केबिनमध्ये बसून सर्वसामान्यांचे प्रश्न कळत नसल्याचा टोला लगावला.
COMMENTS