Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींची जीभ छाटू नका, तर तिला चटके द्या !

भाजप खासदार अनिल बोंडे यांचे वादग्रस्त विधान

अमरावती ः वादग्रस्त वक्तव्याची मालिकाच सुरू झाली असून, काँगे्रस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, तर तिला चटके द्या असे वादग्रस्त विधान भाजप ख

राहुल गांधींचा ट्रकने दिल्ली ते चंदीगढपर्यंतचा प्रवास
राहुल गांधी लोकसभेत पुन्हा परतले
राहुल गांधींना दिलासा नाहीच

अमरावती ः वादग्रस्त वक्तव्याची मालिकाच सुरू झाली असून, काँगे्रस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, तर तिला चटके द्या असे वादग्रस्त विधान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारानंतर आता भाजप खासदार बोंडे यांनी असे विधान केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौर्‍यात आरक्षणाच्या मुद्यावर कथित वादग्रस्त विधान केले होते. देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटणार्‍यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची मागणी केली आहे. अनिल बोंडे म्हणाले की, आमदार संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. पण राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेले विधान अतिशय भयानक आहे. कुणी परदेशात जाऊन असे वात्रटासारखे बोलत असेल तर त्याची जीभ छाटू नये, तर त्याच्या जिभेला चटके द्यावेत. अशा लोकांच्या जिभेला चटके देण्याची फार गरज असते. अनिल बोंडे यांनी यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव व अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते श्याम मानव यांच्यावरही निशाणा साधला. भारतातील बहुसंख्यकांच्या भावना दुखावणार्‍या लोकांना किमान त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके निश्‍चितपणे दिले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे.

अनिल बोंडेला तात्काळ अटक करा ः वर्षा गायकवाड – लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना भाजपचे नेते उघड-उघड धमक्या देत असतांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधी यांच्याबद्दल खालची पातळी गाठली आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या अनिल बोंडेला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.खासदार गायकवाड म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड व भाजपाचा खासदार अनिल बोंडे यांच्यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे पण राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. विरोधी पक्षनेत्याला धमक्या देणे हा सत्तेचा माज आहे पण हा माज जास्तकाळ चालणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

COMMENTS