नवी दिल्ली ः निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवल्यानंतर न्यायालयाने रोख्यासंदर्भातील संपूर्ण माहिती न्यायालयात तसेच निवडणूक आय

नवी दिल्ली ः निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवल्यानंतर न्यायालयाने रोख्यासंदर्भातील संपूर्ण माहिती न्यायालयात तसेच निवडणूक आयोगाच्या पोर्टवर टाकण्याचे निर्देश एसबीआयला दिले होते. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार आप पक्षाने भाजपवर गंभीर आरोप करतांना म्हटले आहे की, तोट्यातील कंपन्यांकडून भाजपला कोट्यावधींचे दान दिल्याचा आरोप केला आहे.
आपचे खासदार संजय सिंह यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर गंभीर आरोप करतांना म्हटले आहे की, भाजपला निधी देणार्या कंपन्यांच्या यादीतल्या 33 कंपन्या अशा आहेत ज्यांचे गेल्या सात वर्षांमध्ये 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, मात्र त्याच कंपन्यांनी भाजपाला 450 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. भाजपला निधी देणार्या कंपन्यांच्या यादीत 17 कंपन्या अशा आहेत ज्यांनी एकही रुपयांचा कर दिलेला नाही अथवा त्यांना करात सवलत मिळाली आहे. यापैकी 6 कंपन्या अशा आहेत ज्यांनी भाजपाला 600 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यामध्ये एक कंपनी अशी आहे ज्या कंपनीने त्यांना जितका नफा झाला आहे त्याच्या तीन पटीने अधिक निधी दिला आहे. किती दिलदार कंपनी आहे पाहा या यादीत एक कंपनी अशी आहे ज्या कंपनीने त्यांच्या नफ्याच्या तब्बल 93 पट निधी दिला आहे. तर 3 कंपन्या अशा आहेत ज्यांनी कर भरलेलाच नाही, मात्र भाजपाला 28 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
देशात गेल्या पाच वर्षांमध्ये जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले त्यापैकी जवळपास 50 टक्के निवडणूक रोखे एकट्या भारतीय जनता पार्टीने वटवले आहेत. यामधले बरेचसे रोखे हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वटवण्यात आले आहेत. निवडणूक रोख्यांबाबतच्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या काळात एसबीआयने तब्बल 22 हजार 217 निवडणूक रोख्यांची विक्री केली. त्यातील सर्वाधिक म्हणजेच 8 हजार 633 निवडणूक रोखे (46.74%) एकट्या भाजपाने वटवले आहेत. यातून भाजपाला 12 हजार 769 कोटी रुपये मिळाले आहेत. भाजपाला मिळालेल्या निवडणूक रोख्यांवरून आतापर्यंत अनेक आरोप झाले आहेत. ज्या कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी), आयकर विभाग (आयटी) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) धाडी टाकल्या आहेत. या धाडींनंतर काहीच दिवसांनी या कंपन्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले आहेत आणि हे निवडणूक रोखेनंतर भाजपाने वटवल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. यातच आता आपले नवी माहिती सादर केली आहे.
COMMENTS