Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईचरणी वाबळे यांच्याकडून सुवर्णजडीत रुद्राक्ष माला दान

शिर्डी/प्रतिनिधी ः संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरीचा मंत्र देणार्‍या साईबाबांचा महिमा महान आहे बाबांच्या शक्तीची अनुभूती अनेकांना पावलोपावली येत असते

देशात व राज्यात परिवर्तनाची लाटः आकाश नागरे
चार गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस बाळगणारे चार आरोपी जेरबंद
कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात

शिर्डी/प्रतिनिधी ः संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरीचा मंत्र देणार्‍या साईबाबांचा महिमा महान आहे बाबांच्या शक्तीची अनुभूती अनेकांना पावलोपावली येत असते. अयोध्या काशी प्रयागराज येथून आणलेल्या 108 रुद्राक्षांना सोन्यात मढवून बनवलेला सुवर्णजडीत रुद्राक्ष हार राहाता येथील साईभक्त सुमनताई राजेंद्र वाबळे यांनी साई चरणी अर्पण केला आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते शनिवार रोजी हा सुवर्णजडीत रुद्राक्ष हार शिर्डी येथील साई मंदिरात दान दिला आहे.

     राहाता येथील निस्सिम साईभक्त सौ सुमनताई वाबळे गेली वीस वर्षापासून दर गुरुवारी सायंकाळी नित्यनियमाने साईबाबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात सौ वाबळे यांनी आयोध्या काशी प्रयागराज येथून 108 रुद्राक्ष आणली होती या रुद्राक्षांना सोन्याच्या कॅप करून त्याचा सुवर्णजडीत रुद्राक्ष हार बनवला होता. राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते साईबाबा मंदिरात ही सुवर्णजडीत रुद्राक्ष माला साई चरणी अर्पण करण्यात आली. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके राहाता नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाबळे निखिल वाबळे सई वाबळे रुई येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊराव शिरसाठ सुनीता शिरसाठ तुषार चौधरी रजनीताई गोंदकर नीलिमा जेजुरकर पल्लवी माळवे, नवनाथ वाणी,आबा कोते कुणाल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते साईबाबा समाधी मंदिरात जाऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन ही रुद्राक्ष माला अर्पण करण्यात आली. बालपणापासून साईभक्त असून अयोध्या काशी प्रयागराज येथून रुद्राक्ष आणून त्याचा सुवर्णजडीत हार साईबाबांना अर्पण करण्याची गेली. अनेक दिवसाची मनस्वी इच्छा होती ती साईबाबांनी पूर्ण करून घेतली. मी व माझ्या परिवाराचे भाग्य समजते साईबाबा मनातील सर्व काही इच्छा या पूर्ण करून घेतात याची प्रचिती मला पुन्हा एकदा या निमित्ताने आली असल्याची प्रतिक्रिया साईभक्त सुमनताई वाबळे यांनी दिली.

COMMENTS