Homeताज्या बातम्यासंपादकीय

डोनाल्ड ट्रम्प : आक्रमक राज्यकर्ता !

अमेरिकेच्या ४५ व्या आणि ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प, हे अमेरिकेतील केवळ दुसरेच नेते आहेत; ज्यांना पहिल्या टर्ममध्

एससी आरक्षण, धर्मावलंब आणि केंद्र सरकार !
महामोर्चा आणि पोलिस प्रशासन ! 
जेव्हा कायदाच दुर्लक्षित केला जातो……! 

अमेरिकेच्या ४५ व्या आणि ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प, हे अमेरिकेतील केवळ दुसरेच नेते आहेत; ज्यांना पहिल्या टर्ममध्ये विजय मिळाला, दुसऱ्या टर्म मध्ये पराभव आणि पुन्हा तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना दुसऱ्या टर्मचा विजय मिळाला! काल, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला जगातील निवडक लोकांना निमंत्रित करण्यात आले. परंतु, ज्यांना ही निमंत्रित केले, त्यांच्याकडून करोडोंची फी मात्र वसूल करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प हे उजव्या विचारांचे असल्याचे जगजाहीर आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी अनेक घोषणा केल्या. परंतु, दुसऱ्या टर्म मध्ये ते पराभूत जेव्हा झाले, तेव्हा अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यात, ज्या पंधराशे लोकांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती; त्यांचा गुन्हा त्यांनी आज पहिल्याच दिवशी माफ केला. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ ही घोषणा केली आणि जगावर अमेरिका आता अधिराज्य गाजवेल, अशा प्रकारची वल्गनाही त्यांनी केली. अर्थात, अमेरिकन सैन्य आता युद्ध लढण्यासाठी अमेरिकेच्या बाहेर जाणार नाही, अशी घोषणा करतानाच अमेरिकेतील सैन्याला आता अधिकार अधिक देण्याची भूमिका ही त्यांनी यावेळी स्पष्टपणे मांडली. मात्र, अमेरिकेत जन्मलेल्या परंतु मुळ अमेरिकन नसलेल्या नागरिकांना आता यापुढे अमेरिकन नागरिक बनण्याची सवलत मिळणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र, त्यांच्या या पहिल्याच भाषणामध्ये अमेरिकन पत्रकारांनी ज्या गोष्टी पकडल्या, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ट्रम्प यांनी खोट्या किंवा असत्य असल्याचे सांगितले आहे. ट्रम्प यांचा पहिला चार वर्षाच्या काळामध्ये त्यांनी ३० हजार  ७ शे पस्तीस वेळा खोटे, असत्य किंवा अवाजवी आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले; तर, पहिल्या टर्मला ते राष्ट्राध्यक्ष असताना पहिल्या  केवळ शंभर दिवसात ४९५ वेळा ते खोटं बोलले असल्याची नोंद अमेरिकन पत्रकारांनी करून ठेवलेली आहे. कालही, त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात काही गोष्टींचा उल्लेख केला. त्यामध्ये, पनामा कालवा हा चीन सध्या संचलित करीत आहे, त्यामुळे चीनकडून तो आता अमेरिका आपल्या ताब्यात घेईल, असं वक्तव्य केलं; परंतु, या वक्तव्याला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही. कारण, त्याचं संचलन चीन करत नाही, असं अधिकार्यांनी स्पष्ट केलं. अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी कारकीर्द अधिक आक्रमक मानली जाते आहे. जगावंव आपल्या अर्थव्यवस्थेचा ठसा उमटवण्याची त्यांची अनोखी पद्धत जगाला ज्ञात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी घेण्यापूर्वी १८ जानेवारीलाच ट्रम्प बिटकॉइन मार्केटमध्ये आणला. परंतु, त्याची प्रत्यक्षात ओळख जगाला २०  जानेवारीला झाली. त्यामुळे दोन दिवसात हा प्रयोग एका डॉलर ने सुरु होऊन साडेसात हजार डॉलर पर्यंत पोहोचला; याचा अर्थ, डोनाल्ड ट्रम्प या सत्तेचा उपयोग त्यांच्या स्वतःच्या आर्थिक मजबुतीसाठी देखील करतील, ही गोष्ट मात्र स्पष्ट आहे. त्याचबरोबर जगातल्या ज्या भांडवलदारांना त्यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यात निमंत्रित केले होते, त्यापैकी अनेकांना असे वाटते आहे की, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन व्यापारात आपल्याला संधी देतील. परंतु, जेव्हा ते ‘अमेरिका इज फर्स्ट’ अशी घोषणा करतात, तेव्हा, त्यांच्या दृष्टीने सारेच दुय्यम ठरते. एक मात्र खरे की, डोनाल्ड ट्रम्प हे जगाला थेट युद्धापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसणार असले तरी, आर्थिक युद्ध लादण्याचा प्रकार मात्र ते जराही कमी करणार नाहीत; ही साधार भीती जगभरातल्या सत्ताधाऱ्यांना आणि भांडवलदारांनाही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व मात्र अमेरिकन लोकशाही ला पोषक मानले जात नाही, एवढे मात्र खरे!

COMMENTS