Homeताज्या बातम्यादेश

 रेल्वे रुळाच्या बाजूला असतात हे बॉक्स, तुम्हाला माहितीय का याचा उपयोग ?

पुढील मोजणीमध्ये फरक असल्यास, हा बॉक्स लाल सिग्नल देतो

रेल्वेने दररोज जवळपास करोडो लोक प्रवास करतात. लांब प्रवासी गाडीच नाही तर अगदी लोकलने देखील दररोज लाखो लोक प्रवास करतात. तेव्हा तुम्ही रेल्वेशी सं

गोदावरी बायोरिफायनरीजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
शारदा शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

रेल्वेने दररोज जवळपास करोडो लोक प्रवास करतात. लांब प्रवासी गाडीच नाही तर अगदी लोकलने देखील दररोज लाखो लोक प्रवास करतात. तेव्हा तुम्ही रेल्वेशी संबंधीत अनेक गोष्टी पाहिल्या असतील. पण त्या का असतात किंवा त्यांचं काम काय? असा विचार आपण जास्त करत नाही.
त्यांपैकी एक म्हणजे रेल्वे रुळाच्या बाजूला असलेले मेटल बॉक्स. यांना आपण नेहमी पाहातो. पण हे बॉक्स नेकमं काय काम करतात? याबद्दल आपण फारसा विचार करत नाही किंवा तो इलेक्ट्रीकल बॉक्स असावा जो, ट्रेनशी संबंधीत गोष्टी कन्ट्रोल करत असावा, पण तसे नाही. याचा वापर काही वेगळाच आहे.

या बॉक्सला काय म्हणतात?

याला ‘एक्सल काउंटर बॉक्स’ म्हणतात . आणि हे बॉक्स तीन ते पाच किमीवर बसवले जातात. हे बॉक्स ट्रेनचे एक्सल मोजतात. हे एक्सल ट्रेनच्या बोगीच्या दोन चाकांना जोडलेला असतो आणि त्याला हे उपकरण मोजतो. हे उपकरण फक्त त्या अक्षांची मोजणी करते. हा ‘एक्सल काउंटर बॉक्स’ ट्रेन गेल्यावर सांगते की त्यात चाकांची संख्या कमी आहे. यामुळे तुम्हाला संभाव्य अपघाताची माहिती मिळते.

हा एक्सल काउंटर बॉक्स कोचमध्ये बसवलेल्या एक्सलची मोजणी करतो आणि पुढील बॉक्समध्ये पाठवतो आणि नंतर तोच क्रम राहतो. अक्षांची संख्या कमी असल्यास किंवा पुढील मोजणीमध्ये फरक असल्यास, हा बॉक्स लाल सिग्नल देतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या अपघातांपासून ट्रेन वाचते.

COMMENTS