Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैनिक फेडरेशन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील पाळेकर

मुखेड प्रतिनिधीः- मुखेड येथील राजे छत्रपती सैन्य व पोलीस अकॅडमीचे संचालक व माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमने पाळेकर यांची सैनिक फेडरेशन संघटनेच

मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा
माजी खा. राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रा आज सांगलीत
अण्णाभाऊंच्या योगदानामुळेच मुंबई महाराष्ट्रात-पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर

मुखेड प्रतिनिधीः– मुखेड येथील राजे छत्रपती सैन्य व पोलीस अकॅडमीचे संचालक व माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमने पाळेकर यांची सैनिक फेडरेशन संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही निवड माजी खासदार तथा सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक व संघटनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी डी. एफ. निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत ज्ञानेश्वर पाटील डुमणे पाळेकर यांनी महारक्तदान सारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तसेच अकॅडमीच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातील गरीब व ज्यांना आई-वडील नाहीत अशा अनाथ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी या अकॅडमीला भेट देऊन त्यांचे कौतुक केले आहेत. तसेच डुमणे पाटील यांची विद्यार्थ्यांच्या पाठीशी असणारी अहोरात्र मेहनत,जिद्द व चिकाटीमुळे महाराष्ट्र तसेच बाहेर राज्यातील दरवर्षी हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहेत. आजपर्यंत अकॅडमी मधून प्रशिक्षण घेऊन शेकडो विद्यार्थी देशाच्या विविध भागात कार्यरत आहेत. डुमणे पाटील यांच्या परिश्रमामुळे ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी राजे छत्रपती अकॅडमी ही वरदान ठरली. तसेच राजे छत्रपती सैन्य व पोलीस अकॅडमी मुखेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार समारंभ व भव्य रॅली काढून सैनिकांचा आदर व भावनिक वातावरण निर्माण केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन सैनिक फेडरेशन संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातील विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS