उत्तर प्रदेश प्रतिनिधी - कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्याशी संबंधित सर्वजण येतात. त्यांच्या जाण्याने
उत्तर प्रदेश प्रतिनिधी – कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्याशी संबंधित सर्वजण येतात. त्यांच्या जाण्याने प्रत्येकजण दु:खात असतो. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवून कुटुंबीयही रडतात. काही लोक शोक व्यक्त करण्यासाठी येतात. पण कुणाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणारे डीजेच्या तालावर नाचत आहे याची कल्पना देखील करता येत नाही. पण मृत व्यक्तीची शेवटची इच्छा तशीच होती. उत्तर प्रदेशातील झाशीच्या मौरानीपूर शहरात राहणाऱ्या लोहपीत कुटुंबाने मोठ्या थाटामाटात आपल्या ज्येष्ठाची अंत्ययात्रा काढली. या वेळी अंत्ययात्रेत केवळ डीजे वाजवण्यात आला नाही तर महिला आणि नातेवाईकांनीही जोरदार नृत्य केले. मौरानीपूर येथे राहणाऱ्या भटक्या लोहार कुटुंबातील वडील करणबीर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते .मृत्यूपूर्वी करणबीरने आपल्या कुटुंबियांकडे इच्छा व्यक्त केली होती की, जेव्हा त्याचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेत डीजे वाजवावा. यानंतर करणबीरचा मृत्यू झाल्यावर त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनी अंत्ययात्रेत डीजे वाजवला आणि महिलाही डीजेच्या तालावर नाचल्या. अंत्ययात्रेत उपस्थित कुटुंबातील महिला आणि नातेवाईकांनी नृत्य करून करणबीरला अखेरचा निरोप दिला. करणबीरची अखेरची यात्रा पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडले.याचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला असून आता पर्यंत सुमारे 92 लाखाहून अधिक लोकांनी पहिला आहे
COMMENTS