Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 रोटरी क्लब ऑफ संगमनेरकडून सफाई कामगारांची दिवाळी

संगमनेर : दिवाळीचे वेध सर्वांनाच लागले असताना समाजातील प्रत्येक घटकाने आनंदात, उत्साहात दिवाळी साजरी करावी या विचाराने रोटरी क्लब ऑफ संगमनेरकडून

संत ज्ञानेश्‍वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा त्वरित सादर करा
नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा.. आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ
भिंगारच्या जुगार अड्ड्यावर छापा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर : दिवाळीचे वेध सर्वांनाच लागले असताना समाजातील प्रत्येक घटकाने आनंदात, उत्साहात दिवाळी साजरी करावी या विचाराने रोटरी क्लब ऑफ संगमनेरकडून दरवर्षी वंचितांची दिवाळी हा उपक्रम आयोजित केला जातो. ह्यावर्षी क्लबने संगमनेर नगर परिषदेमधील दीडशे सफाई कामगार भगिनींना साड्या व ८१ कुटुंब प्रमुखांना रुपये पाचशे किमतीची किराणा मालाची किट वाटप केले. या वेळी प्रमुख पाहुणे संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे ह्यांनी रोटरी क्लबने सफाई कामगारांना केलेल्या योगदानाचे अभिनंदन केले. ह्या प्रकल्पासाठी प्रत्येक रोटरी सदस्याने रोख मदत, राजेंद्र व राजपाल कापड दुकानाकडून मोफत साड्या आणि दिवटे किराणा कडून सवलतीच्या दारात किराणा मालाची कीट तयार करण्यात आली होती. ह्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे, सचिव विश्वनाथ मालानी, प्रकल्प प्रमुख अजित काकडे, नरेंद्र चांडक, ओमकार सोमाणी, सोनू राजपाल, रमेश दिवटे, जीवन जाधव, दर्शन रोटरी हॉस्पिटलचे अध्यक्ष संजय राठी, दिलीप मालपाणी, सुनील कडलग उपस्थित होते. तसेच प्रकल्पासाठी देणगीदार दीपक मणियार, रो.साईनाथ साबळे, रो दीपक मणियार, नवल कैलास मालपाणी, रो.नरेंद्र चांडक, रो. संजय राठी, रो संदिप फटांगरे,  रो हृषिकेश मोंढे, रो. मनमोहन वर्मा, रो. पवन वर्मा, रो. योगेश बारड, रो. शरद तुपविहीरे रो. अमोल गुंजाळ, रो.रामेश्वर भंडारी, सौ. भक्ती अनिरुद्ध बाहेती, रो. डॉ. प्रमोद राजुस्कर, रो. संजय लाहोटी, रो सुजय कानवडे, रो संतोष आहेर, रो डॉ. रमेश पावसे, रो.संकेत मुळे, रो. सौरभ म्हाळस,  रो सुनील दिवेकर, रो.राजेंद्र खोसे, रो. संकेत काजळे, रो. आनंद हासे, रो. सुदीप वाकळे, रो. सिद्धार्थ तांगडकर, रो. सचिन करंजीकर, रो.अभिजीत दिघे, रो. अरविंद कासट, रो. डॉ. विनायक नागरे, रो. योगेश गाडे, रो. दिलीप कोकणे, रो. रविकांत ढेरंगे, रो. विवेक रोहोकले , शशिकांत मालाणी, रो.विश्वनाथ मालानी, रो. सुनिल घुले, रो. अमित पवार, रो.अतुल अजित वखारिया, रो.संजय कर्पे कार्यक्रमास उपस्थित होते. दिवाळीच्या अगोदर नुकताच फुलझडी हा शॉपिंग महोत्सवही रोटरी क्लबने इनरव्हील क्लबच्या सहायाने यशस्वी आयोजित केला होता. 

COMMENTS