कोपरगाव शहर : सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या ९७ जयंती निमित्त संबंध तालुकाभर वेगवेगळ्या समाजपयोगी उपक्रम राबवत प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. त्याच अनुशंघाने कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत,जिल्हा परिषद शाळा सहजानंदनगर, जिल्हा परिषद शाळा रेल्वे स्टेशन व जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर या ठिकाणी प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी या तिन्ही शाळेच्या ६०० हुन अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत शिंगणापूर यांच्या वतीने गावातील दिव्यांगाना २१०० रुपयांचा धनादेश देऊन स्व. शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करण्यात आले. यात शिंगणापूर गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. विजय काळे यांनी रायटिंग पॅड, माजी सरपंच भीमराव संवत्सरकर यांनी पिण्याच्या पाण्याची बॉटल, ग्रामपंचायत सदस्य संजय तुळसकर यांनी पेन वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच डॉ विजय काळे, माजी सरपंच यादवराव संवत्सरकर भीमराव संवत्सरकर,, उपसरपंच शाम संवत्सरकर, राजेंद्र लोणारी, ग्रामपंचायत सदस्य संजय तुळसकर,अशोक वराट, दिनकर मोरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय संवत्सरकर, लक्ष्मीकांत संवत्सरकर, प्रमोद संवत्सरकर, सुनील भोसले, पंकज कुर्हे, सतीश निकम,मनोज इंगळे,ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे, शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र हरकल, खेमनर, सर्व शिक्षक वृंद सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आदींसह शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित अनेक मान्यवरांनी तसेच विद्यार्थ्यांना स्व.शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस अभिवादन करत मनोगत व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

COMMENTS