रेणापूर प्रतिनिधी - लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांना उदंड आयुष्य मिळावे. यासाठी येथील ग
रेणापूर प्रतिनिधी – लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांना उदंड आयुष्य मिळावे. यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळवाटपाचा कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव , माजी शहराध्यक्ष तुकाराम कोल्हे, शहराध्यक्ष मतीन अली सय्यद, माजी संगायो समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, माजी सभापती प्रदिप राठोड,रेणाचे माजी संचालक रविकांत अकनगिरे, सेवादल कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष हनमंतराव पवार, माजी संचालिका इंदुबाई इगे, महिला कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा पुजा इगे, जयश्री गुरव, अनिता शिंदे,अनिल पवार, अजय चक्रे, अजय राठोड, बाळासाहेब करमुडे, माजी नगरसेवक पद्म पाटील, प्रमोद कापसे, भुषण पनुरे, अमर वाकडे,प्रदिप काळे,सचिन इगे, रविंद्र नागरगोजे, धनंजय भांबरे, अतुल कातळे, रेणुका जोगी, मिरा पांचाळ, सुरेखा इगे, राज मस्के, प्रकाश भुतके, सिद्धार्थ चव्हाण यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक डॉ. अलगुले, डॉ. शेख, ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रेणापूर तालूक्यातील इंदरठाणा येथील हजरत बाबा फरीद रहेमतुल्ला अलै दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली. यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष तथा लातूर जल्हिा मजूर फेडरेशन संचालक आशादुल्ला सय्यद, रखुमाई निधी-लि चेअरमन तथा ग्रा.प. सदस्य महादेव उबाळे, सेवादल कॉग्रेसचे उपाध्यक्ष जबेर नशीर पटवारी, माजी चेअरमन रसिद पटवारी ,साजित सय्यद ,यासीन पटवारी,बाबु सय्यद, मुबारक सय्यद,निजाम शेख, बळीराम जोगदंड,बाशिद पटवारी,अनवर शेख, सादिक पटवारी,कलीम सय्यद, एकबाल सय्यद यांच्यासह आदी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. रेणापूर तालुक्यातील दवणगाव येथील ग्रा.पं. सदस्य राज मस्के यांनी जि.प. प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रवींंद्र नागरगोजे हे होते तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, अजयकुमार चक्रे, अमर वाकडे ग्रा.पं. सदस्या सौ. रोहिणीताई नागरगोजे , सौ. ज्योतीताई नागरगोजे, सौ. वनिता नागरगोजे , प्रकाश भूतके ,जेष्ठ नागरिक नागनाथ नागरगोजे, रंभाजी नागरगोजे, नौबद्धे, रविकांत नागरगोजे, संतोष नागरगोजे , संतोष सलगर, धनराज नागरगोजे, गणेश गोयकर, गौतम बुक्तर, गंगाधर मस्के यांच्यासह शिक्षक ,शिक्षीका उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक बंडेवार तर आभार मुख्याध्यापक धावने यांनी मानले.
COMMENTS