देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः सामाजिक कार्यात नावलौकिक मिळवलेल्या उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानचा यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 9 एप्रि
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः सामाजिक कार्यात नावलौकिक मिळवलेल्या उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानचा यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या शुभाशीर्वादाने व ना. अंबादास दानवे (विधानपरिषद विरोधीनपक्ष नेते, महाराष्ट्र), यांच्या हस्ते तसेच आमदार निलेश लंके, सेनेचे संपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे, रेणुकामाता मल्टिस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष दीपक पंडित व उपाध्यक्षा विद्याताई करपे यांनी दिली.
उंबरे येथे दरवर्षी विविध क्षेत्रात चांगले काम केलेल्या व्यक्तींचा छ्त्रपती प्रतिष्ठानच्या पुरस्काराने सन्मान केला जातो. यावर्षी तीन दिवसीय सामाजिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. 7 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 आरोग्य शिबीर आणि सायंकाळी 6 वाजता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची हवामानावर भविष्यवाणी, दि 8 एप्रिल सकाळी 10 ते 5 महिला आरोग्य शिबीर, सायंकाळी 5 ते 6 डॉ मानसी पाटील, (अध्यक्ष नासा संघटना, पुणे ) यांचे व्याख्यान तसेच रात्री 7 ते 9 साध्वीजी कुमारी प्रियंका लोणे (लव्हजिहाद, बुलंद तोफ, औरंगाबाद ) यांचे व्याख्यान, तसेच दि 9 एप्रिल सकाळी 10 ते 5, आरोग्य शिबीर ( पुणे टीम), सायंकाळी 4 ते 6 हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन सर्व कार्यक्रम प्रा. दत्ताञय अडसुरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. तरी वृक्षलागवड, महिला सबलीकरण, क्रीडा, प्लास्टिकमुक्त अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, जलसंधारण, विधितज्ज्ञ, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, तंटामुक्ती अभियान, राजकीय विश्लेषक, पत्रकारिता, इलेकंट्रोनिक मिडिया इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या व्यक्तींनी छत्रपतीं प्रतिष्ठान उंबरे, या पत्त्यावर आपले प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन विलासराव ढोकणे, लक्ष्मण पटारे, शरद ढोकने, संदीप गायकवाड , शरद वाघ, गोरक्ष ढोकणे, आकाश साबळे, गणेश आलवणे, सचिन शेजुळ, सोपान ढोकणे, आदीनी केले आहे.
COMMENTS