Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाईत आशाताईंना टोपी व बॅगचे वाटप

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी चा उपक्रम

अंबाजोगाई प्रतिनिधी - वाढत्या उन्हात काम करताना आशाताईंना  हातातील ओझे सांभाळण्यासाठी बॅग तर उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून डोक्यावर टोपी चा आध

मराठा सर्वेक्षणाचे अ‍ॅप चालूच होत नसल्याने प्रगणकांना मनस्ताप
नागपूर हादरलं! कारमध्ये गतिमंद मुलीवर ओला चालकाने केला अत्याचार
भाजपने विरोधी मतांचे विभाजन करून हा विजय मिळविला : ना. जयंत पाटील

अंबाजोगाई प्रतिनिधी – वाढत्या उन्हात काम करताना आशाताईंना  हातातील ओझे सांभाळण्यासाठी बॅग तर उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून डोक्यावर टोपी चा आधार देण्याचे काम रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या माध्यमातून करण्यात आले.येथील नागरी रुग्णालयात हा उपक्रम झाला.
सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी च्या वतीने  अंबाजोगाई तालुक्यातील सर्व आशा वर्कर्स यांना उन्हाळी टोपी आणि हँड बॅग  देऊन त्यांचा सन्मान केला.अगदीच तुटपुंज्या मानधनावर काम करणार्‍या आशा ताई या वाडी वस्ती तांड्यावरती आरोग्य सेवा देतात. तसेच सरकारची प्रत्येक योजना सामान्य माणसांपर्यंत  पोहचवणाचे प्रभावी माध्यम त्या आहेत.अनेक अडचणींना सामोरे जात या आशा ताई आपले कर्तव्य प्रामाणिकपणे सांभाळत असतात. ना उन्हाची तमा न पावसाची पर्वा, म्हणूनच या आशा ताईंचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या पाठीवरती शाबासकी ची थाप देऊन त्यांचं कौतुक केलं पाहिजे, म्हणूनच रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी ने सुरू होणार उन्हाळा लक्षात घेता अंबाजोगाई तालुक्यातील सर्व आशा वर्कर्स यांना उन्हाळी टोपी व हँडबॅग चे वितरण  नागरी रुग्णालय, मंडी बाजार येथे केले. यावेळी रोटरी चे अध्यक्ष अध्यक्ष मोईन  शेख, सचिव भीमाशंकर शिंदे,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ बाळासाहेब लोमटे, प्रकल्प संचालक डॉ नितीन चाटे, डॉ प्रदीप दामा, संतोष मोहिते,, शकील शेख, डॉ निशिकांत पाचेगावकर, स्वप्नील परदेशी, डॉ सुरेश अरसुडे, गणेश राऊत, राम सारडा, अजित देशमुख, स्वरूपा कुलकर्णी, राधेशाम लोहिया, ओमकेश दहिफळे, अनिल लोमटे, प्रदीप झरकर, अरुण असरढोकर, जगदीश जाजू, विनोद मुंदडा, संजय देशमुख, संभाजी बुर्गे, व आशाताईंची उपस्थिती होती.

COMMENTS