Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची पंचक्रोशीत चर्चा

हिंगोली प्रतिनिधी - गरम तव्यावर बसून शिव्या घालणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत आला आहे. हिंगोलीतील हा बाबा हात पाय न हलवता

नांदेड तालुक्यात सोमेश्वर  परिसरात  गारांचा वादळी वार्‍यासह पाऊस
लातुरात आता पशुरोग निदान प्रयोगशाळा
मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर

हिंगोली प्रतिनिधी – गरम तव्यावर बसून शिव्या घालणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत आला आहे. हिंगोलीतील हा बाबा हात पाय न हलवता पाण्यावर तरंगत आहे. अनेक जण याला चमत्कार समजून बाबाच्या दर्शनाला येत आहेत. तर, हा योग क्रियेचा एक प्रकार असल्याचे देखील म्हंटले जात आहे हिंगोली जिल्ह्यात हा पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत आहे. हिंगोली तालुक्यातील धोतरा येथे भागवत सप्ताह सुरू आहे. भागवताचार्य हरिभाऊ राठोड महाराज हे भागवत करत आहेत. ते पाण्यावर अधांतरी राहू शकतात असा दावा त्यांनी भागवत करतांना केला होता. याचे प्रात्यक्षिक या बाबांनी गावातील जाधव यांच्या शेतातील भल्या मोठ्या विहिरीत करून दाखविले. तब्बल अर्धा तास हे बाबा पाण्यावर तरंगत राहिले. गावकऱ्यांनी या तरंगणाऱ्या बाबाचा मोबाईल फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड केला. याचे काही व्हिडीओ प्राप्त झाले आहेत. बाबांसोबत एक महिला देखील पाण्यावर आधर तरंगतांना दिसत आहे. या क्रियेला “पद्मासन” असे म्हटले जात असल्याचे गावकर्यांनी सांगितले. याला गावकरी मात्र चमत्कार समजू लागले आहेत. याबाबत अनेकजण आश्चर्य देखील व्यक्त करत आहेत

COMMENTS