Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन

मुंबई ः माया दर्पण आणि ’तरंग’ सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन झाले आहे. त्यांना समांतर सिनेमांचे प्रणेते मानले जाते. वयाच्

रामेश्‍वरच्या त्रिवेणी संगमावर तिघा भावांचा बुडून मृत्यू
नेवाशात विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यू
नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

मुंबई ः माया दर्पण आणि ’तरंग’ सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन झाले आहे. त्यांना समांतर सिनेमांचे प्रणेते मानले जाते. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. कुमार साहनी यांनी ’माया दर्पण’, ’तरंग’, ’ख्याल गाथा’ आणि ’कसबा’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. दिग्दर्शकासोबतच कुमार साहनी यांनी लेखक आणि शिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. कथा सांगण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीने त्यांना वेगळी ओळख मिळाली. दिग्दर्शक असण्यासोबतच ते शिक्षक आणि लेखकही होते.

COMMENTS