Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड; राष्ट्रवादी कार्यकर्ते महाडीक यांच्या संपर्कात

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिराळा मतदार संघातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नाईक यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने शि

श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी यांचा शाही विवाह सोहळा थाटात
नृत्यकला अकॅडमीची विद्यार्थिनी पौर्णिमा अंबरगे ठरली मिस फलटण
शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करुन कोरोना प्रतिबंधक साधनसुविधा पुरविण्याची शिक्षक परिषदेची मागणी

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिराळा मतदार संघातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नाईक यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने शिराळा तालुक्यातील भाजपला खिंडार पडले आहे, अशी भावना काही नेत्यांची झाली आहे. राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांनी नाईक गटाच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात सामावून घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड झाल्याने वाळवा शिराळा तालुक्यात महाडीक गटाची ताकद वाढणार असल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे .
शिराळा विधानसभा मतदारसंघाची रचना पाहता तेथे राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांचा प्रभाव असलेल्या वाळवा तालुक्यातील 48 गावे आहेत. या संपूर्ण मतदार संघातील प्रत्येक गावात काही ना काही प्रमाणात माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे कार्यकर्ते आहेत. या 48 गावात महाडीक गटाचाही प्रभाव आहे. सन 2009 च्या निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष उमेदवार मानसिंगराव नाईक आमदार झाले होते. सन 2014 ला दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यामुळे मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसकडून सत्यजित देशमुख अशी मत विभागणी झाली आणि शिवाजीराव नाईक यांचा विजय झाला.
महाडिक बंधूंनी महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजप पक्षातील महाडिक गटाचे जाळे विणले आहे. यामुळे शिराळा विधानसभा मतदार संघात भाजप पक्षाची ताकद वाढत आहे. सम्राट महाडिक यांची युवा वर्गावर चांगलीच पकड आहे. सत्यजित देशमुख हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने फारसा फरक पडलेला दिसत नाही. गत विधानसभा निवडणुकीत देशमुख गटाची मते शिवाजीराव नाईक यांना फारसी पडलेली नाही. मात्र, सम्राट महाडिक यांनी भाजप प्रवेश करून विधानसभा निवडणुकीत महाडीक गटाची वोट बँक तयार केली आहे. यामध्ये आता शिवाजीराव नाईक गटाचे समर्थक महाडिक गटात सामील झाले तर महाडिक गटाची ताकद वाढणार हे निश्‍चित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवाजीराव नाईक यांचा प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशाने सद्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. गत निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदार संघात भाजपमध्ये दोन गट होते. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळत होता. आता शिराळा विधानसभा मतदार संघातील भाजप पक्षात फक्त महाडिक हा एकच गट शिल्लक राहिला आहे. यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असली तरी अंतर्गत धुसपुस सुरू असणार आहे. धुसपुसीचा फायदा महाडिक गटाला नक्कीच होणार आहे.
एकंदरीत धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड झाल्याने दोन्ही नाईक गटाचे कार्यकर्ते महाडिक गटात सामील होण्याच्या तयारीत असताना दिसत आहेत. तसेच महाडीक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व ऊर्जा निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका , ग्रामपंचायत निवडणूकित भाजप म्हणजेच महाडिक गट असा नारा कार्यकर्त्यांनी चालू केला आहे.

COMMENTS