Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही – आ. बालाजी कल्याणकर

नांदेड प्रतिनिधी - नांदेड उत्तर मतदार संघातील हसापूर या गावातील बालाजी मंदिर सीसी रस्ता, हनुमान मंदिर येथील फ्लावर ब्लॉक तसेच श्री राम मंदि

उत्तरप्रदेशात आयएसआयच्या हस्तकाला अटक
ऐफाज व तैमुर ने धरले रमजानचा उपवास
ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक, गुणवत्तापूर्ण करावी : मंत्री जयकुमार गोरे

नांदेड प्रतिनिधी – नांदेड उत्तर मतदार संघातील हसापूर या गावातील बालाजी मंदिर सीसी रस्ता, हनुमान मंदिर येथील फ्लावर ब्लॉक तसेच श्री राम मंदिर या ठिकाणी फ्लावर ब्लॉक एकूण 30 लाख रुपयांचा आज भूमिपूजन सोहळा आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार कल्याणकर म्हणाले की, माझ्या मतदारसंघांमध्ये कुठल्याही गावाला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मी आपल्या पाठीशी आहे आपण माझ्याकडे मागणी करावी ती मी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करेन. यावेळी मोठ्या प्रमाणात समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.     

COMMENTS