Homeताज्या बातम्यादेश

लिबियात विनाशकारी पूर; 5 हजार जणांचा मृत्यू

सुमारे 10 हजार लोक बेपत्ता ; रस्त्यांवर मृतदेहांचा खच

डेर्ना/वृत्तसंस्था ः लिबियातील डेर्ना शहरामध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे धरण फुटल्याने पाच हजारापेक्षांही अधिक जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लो

मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची पोलिसांनी काढली वरात
सिक्कीममध्ये भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू
बँकांतील संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे

डेर्ना/वृत्तसंस्था ः लिबियातील डेर्ना शहरामध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे धरण फुटल्याने पाच हजारापेक्षांही अधिक जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेपत्ता आहेत. रस्त्यावर मृतदेहांचा खच पडल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. भूमध्य समुद्रातील डॅनीएल वादळामुळे रविवारी रात्री ढगफुटी होऊन प्रलयकारी पूर आला. त्यामुळे पूर्व लिबियाच्या अनेक शहरांत मोठा विध्वंस झाला. त्यापैकी सर्वाधिक हानी डेर्ना शहरात झाली आहे. आपत्कालीन विभागाकडून दोन हजार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
या पुरात 5 हजार 300 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. तर 10 हजार पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले आहेत. याविषयीची माहिती गृहमंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद अबू- लामोशा यांनी दिली. रविवारीच्या दिवशी वादळामुळे समुद्राचे पुराचे पाणी संरक्षण बांध तोडत शहरात घुसले आणि संपूर्ण शहर पाण्यात वाहून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, डेरनामध्ये आतापर्यंत 1500 मृतदेह मिळाली आहेत. तर मृतांचा आकडा अजून वाढण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय संस्था रेड क्रास आणि रेड क्रिंसेट सोसायटीनुसार, पुरामुळे 10 हजार जणे बेपत्ता झाले आहेत. आपत्ती निवारण मंत्रालयाचे मंत्री हिचेम चिकीओत यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेरनाच्या विनाशकारी पूर मी पाहिले. चहुबाजुला मृतदेह पडले आहेत. रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. हानी होण्याची संख्या निश्‍चितच जास्त असणार आहे. चिकीओतनुसार, मृतांची संख्या वाढू शकते. कारण बेपत्ता होणार्‍यांची संख्या वाढत आहे. शहराला नुकसानग्रस्त परिसर घोषित करण्यात आलंय. पूर्व भागाकडील लिबियाच्या शहरातील अनेक घरांचं नुकसान झालंय. भूमध्यसमुद्रात आलेल्या डेनियनल वादळामुळे पूर आल्याची घटना घडली. या वादाळामुळे समुद्राचे पाणी किनार्‍यावरील संरक्षण बंधारे तोडत शहरात घुसले. लिबियामध्ये असलेल्या अमेरिकने विशेष दूत रिचर्ड नार्टन यांनी सांगितले की, आम्ही यूएन भागीदारांच्या समन्वयाने लिबियाला मदत पाठवत आहोत. इजिप्त, कतार, इराण आणि जर्मनीनेही पूरग्रस्त लिबियाला मदत पाठवण्याचे सांगितले आहे.

तब्बल दोन हजाराहून अधिक मृतदेहांचे दफन – आपत्तीला 48 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर डेर्ना येथे बाहेरील मदत पोहोचण्यास सुरुवात झाली. पुरामुळे किनारपट्टीजवळी शहरांमधील रस्ते खराब झाले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत दोन हजारांहून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक मृतदेह डेर्ना येथील सामूहिक कबरीत दफन करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर आणि ढिगार्‍याखाली अडकलेले इतर अनेक मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथके रात्रंदिवस काम करत आहेत. काही मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पूर्वेकडील लिबियाचे आरोग्यमंत्री ओथमान अब्दुलजलील यांनी दिली.

सरकारचा हलगर्जीपणा नडला – डॅनिएल वादळाची पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. धरण फुटण्याचा आवाज आला तेव्हा या संकटाची माहिती झाली. त्यामुळे नागरिकांच्या पूनर्वसनाचीही सोय करण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. डेर्ना, बायदा, सुसा, मर्ज आणि शाहत. ईशान्य लिबीया हा देशाचा सर्वाधिक सुपीक आणि हरित प्रदेश आहे. बायदा, मर्ज आणि शाहत ही शहरे वसलेला जबल अल अखदर हा भाग देशात सर्वाधिक सरासरी पर्जन्यवृष्टी होणार्‍या प्रदेशांपैकी आहे

COMMENTS