Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री पवार-जयंत पाटलांमध्ये खलबते

पुणे : गेल्या काही दिवसांपासून खा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर अस

बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)
डॉ. रामकृष्ण जगताप यांची ’श्रीरामपूर साहित्य परिषद ’अध्यक्षपदी निवड
अक्षय कुमारला मिळालं भारतीय नागरिकत्व

पुणे : गेल्या काही दिवसांपासून खा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड खलबते झाल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळतांना दिसून येत आहे.
मात्र या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शुगर इंस्टीट्यूटमध्ये 2 बैठकांमध्ये थोडावेळ होता, म्हणून जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात मी अर्थसंकल्पात सांगितले होते. त्याकरता 500 कोटींची तरतूद केल्याचेही जाहीर केले होते. यावर जयंत पाटलांचे म्हणणे जाणून घेतले. या नियामक मंडळात जयंत पाटलांसह अनेकजण आहेत, आम्ही नेहमीप्रमाणे जनरल बॉडीला, नियामक मंडळाला येत असतो.

COMMENTS