Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रालयात झ

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हे, स्वराज्यरक्षक
अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – महेश तपासे 
महाराष्ट्रात राज्य सहकारी बँक घोटाळ्याची ईडीकडून चौकशी

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रालयात झालेल्या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे, पणनमंत्री अब्दुल सत्तार, आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, राहुल अहीर, नितीन पवार, दिलीप बनकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, कृषी आयुक्त सुनील चव्हाण (व्हीसीद्वारे), नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा (व्हीसीद्वारे) पणन महामंडळाचे संचालक केदारी जाधव, उपसंचालक अविनाश देशमुख, नाफेडचे अधिकारी (नाशिक) निखिल पाडदे, नाफेड मुंबईचे अधिकारी पुनीत सिंह, लासलगाव बाजार समितीचे  सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश डमावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापू देवरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, यज्ञेश कडासी, नांदगाव, उमराणा, येवला, देवळा, लासलगाव, पिंपळगाव या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.

COMMENTS