पंढरपूर प्रतिनिधी - समाजामध्ये समता बंधुता आणि मानवता हे अधिक वृद्धिंगत व्हावे. यासाठी मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या जन्मभूमीपासून संत तु

पंढरपूर प्रतिनिधी – समाजामध्ये समता बंधुता आणि मानवता हे अधिक वृद्धिंगत व्हावे. यासाठी मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या जन्मभूमीपासून संत तुकाराम महाराजांच्या देहू गावपर्यंत चोखोबा ते तुकोबा ही समतेची वारी निघाली आहे. या वारीचे नुकतेच पंढरपुरातून देहूकडे प्रस्थान झाले. मंगळवेढा- पंढरपूर ते देहू असा समतेच्या वारीमध्ये ठिकठिकाणी समता ,बंधुता अन संत विचार याचे प्रबोधन व जागृती पर कार्यक्रम होणार आहेत. साधारणपणे 12 जानेवारी पर्यंत ही समतेची वारी श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी जाऊन पोहोचेल. संत चोखामेळा अध्यासन केंद्र यांच्या वतीने चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
COMMENTS