सिव्हिलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हिलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात निष्पाप डॉक्टर व तीन परिचारिका यांच्

दिव्यांग व ज्येष्ठांना केंद्राने दिला आधार : मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांचे प्रतिपादन
प्रसिद्ध कोळसा व्यापारी भगवान राठोड यांचे निधन
अगस्ती भूषण पुरस्काराने मधुकरराव नवले, विश्‍वासराव आरोटे सन्मानीत

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात निष्पाप डॉक्टर व तीन परिचारिका यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयाने डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आणि आस्थापना विभागातील कर्मचार्‍यांना आग लागल्यानंतर प्रतिबंधक उपाययोजनांची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. बैल गेला अन झोपा केल्यास़ारखे तसेच उशिरा सुचलेले शहाणपण म्हणून जळीत दुर्घटनेत 13जणांचा बळी गेल्यानंतर सिव्हीलच्या कर्मचार्‍यांना दिलेले आग प्रतिबंधक प्रात्यक्षिक त्यामुळे चर्चेत आले आहे.
मागील 6 नोव्हेंबरला सिव्हीलमधील अति दक्षता विभागाला आग लागून 13जणांचे मृत्यू झाले आहेत. आग लागली तेव्हा या विभागातील बहुतांश कर्मचारी पळून गेले, बाहेरच्या व्यक्ती व अग्निशामक दलाच्या जवानांनी काही रुग्णांना बाहेर नेले तर काही रुग्ण स्वतःहून व चक्क रांगत रांगत बाहेर पडले तर काहींना त्यांच्या नातेवाईकांनी सुरक्षितस्थळी नेले. या पार्श्‍वभूमीवर सिव्हीलमधील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचार्‍यांना आग वा अन्य दुर्घटना झाल्यावर काय प्रतिबंधात्मक वर्तन करायचे, याची माहितीच नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही त्रुटी दूर करण्यासाठी मनपा अग्निशामक दलाद्वारे त्यांना प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. पण गंभीर घटना घडल्यानंतर असे प्रशिक्षण दिल्याने त्यावर टीकाही होऊ लागली आहे.
महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांनी हे प्रात्यक्षिक दाखविले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील जुने परिचारिका प्रशिक्षण आणि वसतिगृहात या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जमदाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली बांगर यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, प्रशिक्षणार्थी परिचारिका, सफाई कामगार,आस्थापना विभागातील कर्मचारी उपस्थित होते. मिसाळ यांनी आगीचे वेगवेगळे प्रकार आणि ते विझविण्याच्या शास्त्रीय पद्धती सांगितल्या. अग्निशामक दलाचे बाळासाहेब घाटविसावे, भरत पडगे, बाळासाहेब वाघ, नानासाहेब सोलट, शाकीर रंगारी, मच्छींद्र धोत्रे यांनी आग विझविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.

आग लागल्यावर हे करा…
कार्बन डायऑक्साईड सिलेंडर हे सर्व प्रकारची आग विझविण्यासाठी वापरतात. कोरडी रासायनिक पावडर ही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची आग विझविण्यासाठी वापरावी. वाळू ही इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅसची आग विझविण्यासाठी उपयुक्त ठरते. हायड्रो सिस्टिममध्ये इमारतीच्या चारही बाजूंनी पाईपद्वारे प्रत्येक मजल्यावर पाण्याचा मारा केला जातो. आग कोणत्या प्रकारची आहे, यावरून ही आग विझविण्यासाठी योग्य त्या साधनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. दुर्घटनेतील व्यक्तींना प्राथमिक उपचार कोणते करावेत, त्यांना बाहेर कोणत्या पद्धतीने काढावे, याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले.

COMMENTS