Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दानवेंच्या कार्यकर्त्यांचा कुंभार कुटुंबावर हल्ला

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली पीडितांची भेट

जालना ः महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपत नाही तोच, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे आमदार चिंरजीव संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांन

राज्यात अवकाळीने 87 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशमुख यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी मंदिरास सदिच्छा भेट
बिग बॉसच्या घरात पडणार पैशांचा पाऊस

जालना ः महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपत नाही तोच, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे आमदार चिंरजीव संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी कुंभार समाजाच्या एका गरीब कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडण्याचाही इशारा दिला आहे.
पीडित कुटुंबाला झालेली मारहाण हा सत्तेचा माज आहे. भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात पीडित कुटुंब न्यायासाठी टाहो फोडताना दिसून येत आहे. वडेट्टीवार म्हणाले की, संत्रे कुटुंबाला झालेली मारहाण हा सत्तेचा माज आहे. एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना दिली पाहिजे, असा दबाव सत्ताधारी खासदार, आमदार यांनी या कुटुंबावर टाकला. त्यांचे घर जबरदस्तीने पाडून त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली. गरीब बहुजन कुंभार समाजातील हे कुटुंब दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पण जमीन हडपण्यासाठी या कुटुंबाला त्रास दिला जातो, मारहाण केली जाते. भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का? पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन काय करत आहे? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला. गरीब कुटुंब आहे म्हणून त्रास देता, पण या संत्रे कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, प्रसंगी विधानसभेतही आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

केेंद्रीय मंत्री दानवेंच्या गावातील घटना – जवखेडा गावात, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून घर उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबीयांनी केला आहे. राष्ट्रीय महाहामार्ग बनवण्यासाठी नियमाचे उलंघन करून घर उध्वस्त केल्याचा देखील त्यांचा आरोप आहे. उध्वस्त घराचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची दखल घेऊन वडेट्टीवार यांनी गुरुवारी या अन्यायग्रस्त कुटुंबाची जवखेडा येथे जाऊन भेट घेतली. यावेळी घडलेल्या घटनेची माहिती घेऊन त्यांनी संत्रे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

COMMENTS