Homeताज्या बातम्यादेश

राजधानीतील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी

नवी दिल्ली ः छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा नवी दिल्लीतील महाराष्ट्राची ओळख असलेल्या महाराष्ट्र सदनामध्ये उभारण्यात आला आहे. देशाच्या राजधानीत राज

मी औरंगाबादचाच खासदार राहणार : इम्तियाज जलील
केवायसी करणे पडले महागात; 97 हजार रुपयांना गंडा
जुगार खुलेआम चालू असल्याने पोलीस प्रशासन झोपले काय?

नवी दिल्ली ः छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा नवी दिल्लीतील महाराष्ट्राची ओळख असलेल्या महाराष्ट्र सदनामध्ये उभारण्यात आला आहे. देशाच्या राजधानीत राजर्षींचा पुतळा उभारणे ही खरे तर सर्व मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे. पण, हाच पुतळा बदलण्याची मागणी आता केली जात आहे. महाराष्ट्र सदनातील पुतळा महाराजांच्या व्यक्तिमत्त्वानुसार झाला नसल्यानं तो पुतळा बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र सदनामध्ये जाऊन आलेल्या अनेकांनी या पुतळ्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS