Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवण्याची मागणी

राहात्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

राहाता ःराजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी तहसिलदार यांना महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आली नौदल दिनान

संगमनेरात थॅलेसेमिया डे केअर सेंटरचे उद्घाटन
युवक युवतींनी शिक्षणाबरोबर सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा -दिपकसा क्षत्रिय 
भेंडा गोळीबारातील जखमीच्या छातीतील गोळी काढण्यात यश

राहाता ःराजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी तहसिलदार यांना महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आली नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्‍याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलेला पुतळा अचानक कोसळला, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आठ महिन्यातच कोसळला आहे, त्यामुळे आम्हाला दुःख झाले असून आम्हीं त्याचा जाहीर निषेध करतो.  पुतळ्याचे काम चालू असताना स्थानिक लोकांनी निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तक्रारी केल्या होत्या पण त्यावेळी शासकीय अधिकारी व ठेकेदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महायुतीचे सरकार हे अत्यंत भ्रष्ट सरकार आहे ते आता महापुरुषांचे पुतळे सुद्धा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे राहाता महाविकास आघाडीच्यावतीने  मागण्यांचे निवेदन तहसिलदार मोरे यांना देण्यात आले. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा बसविण्यात यावा. महाराजांची अवहेलना करणार्‍या कंत्राटदाराला, त्याच्या कंपन्या यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. संबधित कंत्राटदाराची सुरु असलेली सर्व कामे तातडीने काढून घ्यावीत तसेच महाराजांची अवहेलना करणार्‍याला शिक्षा व्हावी. संबधित कामाची पाहणी करणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी. संबधित निकृष्ट काम करणारा कंत्राटदार हा राजकीय नेत्याच्या जवळचा असून आर्थिक लागेबांध्यातून त्याला काम देण्यात आले होते चौकशी होवून राजकीय नेत्याचे नाव जाहीर करण्यात यावे. असे पत्रकात म्हटले आहे. यावेळी लोंढे, शिवसेना शहर अध्यक्ष गणेश सोमवंशी, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हा सरचिटणीस रणजीत बोठे, अनिल बोठे, राहाता शहर काँग्रेस अध्यक्ष नितीन सदाफळ, भगवानराव टिळेकर, उत्तमराव मते, चंद्रशेखर कार्ले, योगेश बोठे, अमोल खापटे, प्रमोद रोहोम, सोपान हिंगे, अमित महाले, सागर पवार, अमोल आरणे, माउली गाडेकर आदि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

COMMENTS