अहमदनगर/प्रतिनिधी ः रेल्वे मालधक्क्यावर काम करणार्या कामगारांच्या मजुरी दराबाबत 28 जुलै 2021 रोजी दिलेल्या आदेशाची येत्या महिनाभरात अंमलबजावणी क
अहमदनगर/प्रतिनिधी ः रेल्वे मालधक्क्यावर काम करणार्या कामगारांच्या मजुरी दराबाबत 28 जुलै 2021 रोजी दिलेल्या आदेशाची येत्या महिनाभरात अंमलबजावणी करण्याची ग्वाही नगरचे सहायक कामगार आयुक्त कवले यांनी दिले आहे. त्यामुळे या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या मालधक्का कामगारांनी आंदोलन महिनाभरासाठी स्थगित केले आहे. शहर काँग्रेसच्या पुढाकाराने जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महिनाभरात अंमलबजावणीची ग्वाही सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने लेखी दिली.
शुक्रवारी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मध्यस्थीने बैठक झाली. यात एक महिन्याच्या आत सुधारित मजुरी दराच्या आदेशानुसार दरवाढ निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त आणि कामगार यांच्यामध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळे यांनी यशस्वी मध्यस्थी करीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने कामगारांनी एक महिन्यासाठी आंदोलन स्थगित केल्याची माहिती कामगार प्रतिनिधी सुनील भिंगारदिवे, विलास उबाळे यांनी दिली आहे.
काळे यांनी यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त कवले यांना धारेवर धरीत कामगारांची दिशाभूल थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर कार्यालयाचे अधिकारी प्रदीप जगधने हे लेखी आश्वासनाचे पत्र घेऊन आंदोलन स्थळी उपस्थित झाले. यावेळी मंडळाच्या दरवाढीच्या यापूर्वीच्या आदेशाची अंमलबजावणी पुढील एक महिन्याच्या आत करण्यात येईल, असे पत्र मंडळाने दिले. यावेळी कामगारांनी जल्लोष केला. यावेळी बोलताना आंदोलनाचे नेतृत्व करणारे कामगार प्रतिनिधी भिंगारदिवे, उबाळे म्हणाले की, ज्यांच्यावर कामगारांनी आजवर विश्वास टाकला त्यांनी कामगारांच्या हिताचा विचार न करता अधिकारी, ठेकेदार, हुंडेकरी यांच्याशी कामगारांना विश्वासात न घेता संगनमत केले. मात्र, येथून पुढच्या काळात काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हक्काची लढाई अधिक तीव्रपणे लढली जाईल. दिलेले आश्वासन मंडळाने पूर्ण केले नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
COMMENTS