Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर-पुणे इंटरसिटीची मागणी; रेल्वेमार्गावर प्रवाशांची तोबा गर्दी..!

लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्रातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूरला मात्र, रेल्वे विभागाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत

चोपडा येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून तीन लाखाचे चांदीचे दागिने चोरीला 
डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले
राज्यभरात चोरी करणाऱ्या इंदोर येथील टोळीसह एका स्थानिक टोळीला अटक  

लातूर प्रतिनिधी – महाराष्ट्रातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूरला मात्र, रेल्वे विभागाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सोलापूरच्या धर्तीवर लातूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लातूरकरांची आहे. मात्र, याकडे रेल्वे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास इंटरसिटी नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.
मुंबई-पुणे येथून लातूरला प्रवास करणार्‍या प्रवाशांची जागा मिळत नसल्याने मोठी अडचण होत आहे. पर्याय म्हणून खासगी ट्रायव्हल्समधून प्रवास करावा लागतो. सोलापूरच्या धर्तीवर पहाटे आणि पुण्यातून सायंकाळी 5 वाजता इंटरसिटी धावते. याचा मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना फायदा होतो. दिवसभर पुण्यात सोलापूरचे प्रवासी आपले कामकाज आटोपून रात्री 11 वाजता घरी परततात. हा पॅटर्न लातूरसाठी सुरु केला तर लातुरातील हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. विशेष म्हणजे, लातूर-पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरच प्रवाशांची सर्वाधिक गर्दी आहे. लातूर रेल्वे स्थानकातून सकाळी 6 वाजता सुरु केली तर ती पुण्यात कार्यालयीन वेळेत 11 वाजेपर्यंत पुणे स्टेशनला पोहचेल. त्यानंतर सायंकाळी पुण्यातून लातूरच्या दिशेने 5 वाजता रेल्वे धावली तर ती लातुरात रात्री 10 ते 11 या वेळेत दाखल होईल. अर्थात सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळत पुण्यातील कामकाज सहज करणे सुलभ होणार आहे. रेल्वेे विभागाने पुणे-लातूर-पुणे ही नवीन एक्स्प्रेस रेल्वेगाडी प्रायोगित तत्त्वावर सुरू करावी, असा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविला असून, तो परवानगी अभावी पडून असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर पुणे-लातूर-पुणे रेल्वेचा मार्ग मोकळा होणार आहे, असे रेल्वे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.पुणे रेल्वे विभागाकडून प्रस्तावित असलेल्या रेल्वेचे वेळापत्रक गैरसोयीचे ठरणार आहे. पुण्याहून सकाळी 7 वाजता लातूरला रेल्वे मार्गस्थ होईल. ती दुपारी 1 वाजता लातुरात पोहचणार आहे. पुन्हा दुपारी 2 वाजता लातूर येथून ती पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. यातून उलट प्रवशांची हेळसांडच होणार आहे. यासाठी इंटरसिटीला प्राधान्य देण्याची गरज आहे.

COMMENTS