Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमानुष मारहाणीच्या आरोपींना तात्काळ अटकेची रिपाईची मागणी

राहाता/प्रतिनिधी ः हरेगांव येथे तरुणांना झालेल्या अमानुष मारहणीच्या घटनेविरुद्ध निषेध व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांचे विरुध्द कठोर

दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल
राज्यात उष्माघाताचे चार बळी
मराठी नवीन वर्ष म्हणजेच ‘गुढी पाडवा’ याचं महत्व काय? पहा हा SPECIAL VIDEO | GUDI PADWA | LokNews24

राहाता/प्रतिनिधी ः हरेगांव येथे तरुणांना झालेल्या अमानुष मारहणीच्या घटनेविरुद्ध निषेध व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांचे विरुध्द कठोर कारवाई करण्यासाठी राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना रिंपाईच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगांव येथे क्षुल्लक कारणावरून चार तरुणांना झाडाला उलटे टांगून, त्यांना विवस्त्र करून अमानुषपणे केलेल्या मारहाणीच्या घटनेची राहाता तालुका रिपाई पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी युवराज गलांडे व त्याचे इतर साथीदार यांनी जुन्या किरकोळ कारणावरून चारही मुलांना केलेल्या अमानुष कृत्याबद्दल त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशा प्रकारचे अमानुष कृत्य करण्यास कोणाचीही हिम्मत होणार नाही. सदरील आरोपी यांची पार्श्‍वभुमी गुन्हेगारी स्वरूपाची असुन या आरोपींना जर मोकळे सोडले तर त्यांची भिती नष्ट होवून ते अशा प्रकारचे गुन्हे समाजात करु शकतात. त्यामुळे सदर आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कठोर कारवाई करून मारहाण झालेल्या दलित समाजातील अल्पवयीन मुलांना न्याय मिळावा. अशी मागणी निवेनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी प्रदिप बनसोडे जिल्हा अध्यक्ष रिपाई, धनंजय निकाळे ता.अध्यक्ष,गणेश निकाळे  संतोष बनसोडे आतिश लोखंडे, दिपक शिंदे  दिलीप निकाळे,रावा निकाळे,जितु दिवे युवा ता.अध्यक्ष सुनिल लोखंडे . गणेश बनसोडे,ओम निकाळे, बाळासाहेभ खाडे,आतुल बनसोडे,बाबासाहेब बनसोडे,मुसा शेख.किशोर दंडवते.आक्षय साळवे,दिलिप वाघमारे,दिलीप साळवे,आमोल भोसले,नितिन वाघमारे, झुंबर शिंदे उपस्थित होते.

COMMENTS