Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांगरणी करणार्‍या महिलेचा दीराने केला विनयभंग

अहमदनगर प्रतिनिधी - शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत असताना महिलेला सासू-सासर्‍याने मारहाण केली व दीराने विनयभंग केल्याची घटना रविवारी सायंकाळी को

नगरच्या श्रीविशाल गणपतीला चांदीची रत्नजडित अंगठी
मल्टीस्टेट म्हणजे खासगी सावकारी व घटनाविरोधी : पालकमंत्री मुश्रीफांचा दावा
श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य जनतेची लूट

अहमदनगर प्रतिनिधी – शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत असताना महिलेला सासू-सासर्‍याने मारहाण केली व दीराने विनयभंग केल्याची घटना रविवारी सायंकाळी कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत घडली. पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिचे सासू-सासरे व दीराविरुध्द मारहाण, विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिलेचे पती सात वर्षापूर्वी मृत झाले आहेत. त्या दोन मुलींसह सासरी राहात आहे. रविवारी सायंकाळी त्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत होत्या. त्यावेळी तेथे त्यांचा दीर आला. तो फिर्यादीला म्हणाला,‘तुझ्या बापाची शेती आहे काय?’, तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाली,‘ही शेती माझ्या पतीची आहे आणि त्यावर माझा हक्क आहे’, असे म्हणाल्याने त्याने फिर्यादीला शिवीगाळ करीत त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीने प्रतिकार केला असता त्यांचे सासू-सासरे तेथे आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करीत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

COMMENTS