Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरात पाणी पातळीत घट

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांत कोल्हापूरसह परिसरात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पंचगंगा पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरूच होती. पंचगंगा पाणी

चुकीचे काम करणाराच माफी मागतो : मोदींच्या माफीनाम्यावर राहुल गांधींची टीका
सांगली जिल्ह्यातील उमदी येथे आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
जयंत पाटील सोडणार शरद पवारांची साथ ?

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांत कोल्हापूरसह परिसरात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पंचगंगा पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरूच होती. पंचगंगा पाणी पातळीकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नदी पातळीत सातत्याने होणारी वाढ कोल्हापूरकरांचे टेन्शन वाढवत होती. मात्र रविवारी सकाळी पाणी पातळीत ’अल्प’ घट झाल्याने कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी (दि.28 जुलै) पहाटेपर्यंत 47.8 इंच इतकी होती. सकाळी 6 वाजता 1 इंचांनी पाणी पातळी कमी झाली. तर दुपारी 12 वाजेपर्यंत आणखी 4 इंचानी पाणी पातळीत घट झाली असून, दुपारी 12 वाजता 47 फूट 4 इंच इतकी स्थिर झाली आहे. 

COMMENTS