Homeताज्या बातम्यादेश

गेमिंग झोनमधील मृतांची संख्या 30 वर

राजकोट गेमिंग झोनच्या मालकासह तिघांना अटक

अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी गेमिंग झोनचे मालक युवराज सिंह सोलंकी, व्यवस्थापक नितीन जैन आणि मॅनेजर राहुल राठोडला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. या

आता मेंटर देणार पोषण कार्यक्रमाचे प्रशिक्षण
श्रमाचे सौंदर्यशास्त्र गाणारा कवी ! 
पावनखिंड वर दारू पिऊन मद्यपी तरुणांचा धिंगाणा.

अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी गेमिंग झोनचे मालक युवराज सिंह सोलंकी, व्यवस्थापक नितीन जैन आणि मॅनेजर राहुल राठोडला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. या घटनेचा तपास करण्यासाठी गुजरात पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. राजकोट गेमिंग झोन अग्नितांडवात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीच्या घटनेच्या अवघ्या काही तासांमध्येच गुजरात पोलिसांनी गेमिंग झोनचे मालक युवराज सिंह सोलंकी, व्यवस्थापक नितीन जैन आणि मॅनेजर राहुल राठोडला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. या घटनेचा तपास करण्यासाठी गुजरात पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

गुजरातच्या राजकोटमधील एका शॉपिंग मॉलमधील गेमिंग झोनला शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारस भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर तब्बल सहा तासांपेक्षा जास्तवेळ आगी विझवण्याचे काम आणि बचावकार्य सुरू होते. या आगीमध्ये आतापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये 12 लहान मुलांचा समावेश आहे. या आगीमध्ये जखमी झालेल्यांवर गुजरातच्या वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात सरकारने एसआयटीला 72 तासांच्या आतमध्ये 9 सूत्री रिपोर्ट सादर करण्यास सांगितले. 5 सदस्यांच्या एसआयटी टीमला 10 दिवसांत सविस्तर रिपोर्ट द्यायचा आहे. या एसआयटी टीमला तात्काळ राजकोटला जाऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसआयटीच्या रिपोर्टनंतरच ही आग नेमकी कशी आणि कशामुळे लागली या मागचे कारण समोर येईल.

COMMENTS