मुंबई ः समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या पीएला फोनवरून ही धमकी मिळाली आहे. या धमकीच्या फोननं
मुंबई ः समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या पीएला फोनवरून ही धमकी मिळाली आहे. या धमकीच्या फोननंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकीचा फोन कॉल आल्यानंतर अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला या देशाच्या संविधाने कायद्याच्या चौकटीत राहून बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. मला 1995 सालापासून संरक्षण पुरवण्यात आलेले आहे. मात्र आता सरकारने माझे संरक्षण कमी केले आहे. निवडणुकीसाठी ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशातून हे सगळे केले जात आहे, अशी टीका अबू आझमी यांनी दिली. शिवसेना, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ध्रुवीकरण केले जात आहे. भाजप अगोदरच या मार्गावर आहे. हे सरकार हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडण निर्माण करत आहे. मुस्लिमांचा चुकीचा इतिहास सांगून हिंदू लोकांच्या मनात चीड निर्माण केली जात असून या मार्गावरून ते सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही अबू आझमी म्हणाले. दरम्यान, अबू आझमींना मिळालेल्या या धमकी प्रकरणावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांना पूर्ण ते संरक्षण दिले जाईल. मुंबई ही खूप सुरक्षित आहे. येथे महिला रात्रीदेखील फिरू शकतात. हेच मुंबईचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपले पाहिजे, असे दीपक केसरकर म्हणाले.
COMMENTS