वाळूतस्करीचे शूटिंग करणार्‍यास मारहाण करून खुनाची धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळूतस्करीचे शूटिंग करणार्‍यास मारहाण करून खुनाची धमकी

राहुरी रेल्वे स्टेशनजवळ वाळू तस्करांची दादागिरी

अहमदनगर/प्रतिनिधी : वाळूतस्करीचे मोबाईलमध्ये शूटिंग करणार्‍या शेतकर्‍यास मारहाण करून खुनाची धमकी देणाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. राहुरी परिसरात

राहुरी फॅक्टरी येथील पत्रकाराचा अपघातात मृत्यू
वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी
मुस्लीम कब्रस्थानसाठी 2.25 कोटींच्या निधीची मान्यता

अहमदनगर/प्रतिनिधी : वाळूतस्करीचे मोबाईलमध्ये शूटिंग करणार्‍या शेतकर्‍यास मारहाण करून खुनाची धमकी देणाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. राहुरी परिसरात वाळू तस्करांकडून शेतकर्‍याला मारहाण करीत खून करण्याची धमकी देण्याचा प्रकार मुळा नदीपात्रात राहुरी रेल्वे स्टेशनजवळ घडला. या घटनेने वाळू तस्करांची किती दादागिरी वाढली आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
यशवंत प्रभाकर म्हसे (रा.राहुरी स्टेशन रोड) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली की, शेताकडे फेरफटका मारण्यासाठी ते गेले असता शेताच्या बाजूला असलेल्या मुळा नदीपात्रात कडेला ज्ञानेश्‍वर ईश्‍वर खिलारी, अजय संजय बर्डे, बंटी गायकवाड (सर्व रा. गौतमनगर, रेल्वे स्टेशन, राहुरी) यांच्यासह इतरांच्या सुमारे 20 बैलगाड्या वाळू भरण्यासाठी तेथे आलेल्या होत्या. त्या बैलगाड्यांमध्ये वाळू भरून देण्याचे काम अनोळखी लोक करत होते. त्यावेळी या लोकांकडे वाळू भरण्यासाठी कामास असलेले लोक नदीपात्रातून वाळू काढत होते. त्याचे मी मोबाईलमध्ये शुटींग चालू केले, तेव्हा त्यातील 4 अनोळखी जणांनी त्यांना घाण शब्दात शिवीगाळ करत, तू आमची शूटींग काढतो काय असे म्हणत लाकडी दांड्याने त्यांना बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच, तू जर आमच्या नादी लागला तर आम्ही तुझा मुडदा पाडू, जीवे ठार मारु, अशी धमकी दिली. या फिर्यादीवरुन चार अनोळखी जणांविरुद्ध राहुरी पोलिसात भा.द.वि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक फौजदार कटारे हे करीत आहेत.

नागरिकांना संरक्षण कोण देणार?
नदीपात्रांतून वाळूचा होणारा बेसुमार उपसा पर्यावरणालाही घातक ठरू लागला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न सामान्य नागरिक करतात. दुसरीकडे वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या महसूल कर्मचार्‍यांनाही मारहाण होते व आता सामान्य नागरिकांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे. वाळू तस्करीच्या दहशतीने भविष्यात कोणीही याविरोधात आवाज उठवू शकणार नाही. त्यामुळे या दहशतीचा वेळीच बंदोबस्त करण्याची गरज आहे.

COMMENTS