Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे युवकाचा मृत्यु ; नातेवाईकाचा आरोप  शहर पोलिसात डॉक्टर विरुध्द तक्रार  

बुलडाणा प्रतिनिधी -  बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथील दिलीप रामदास गोसावी वय 22 वर्ष हा घरी असतांना त्याला अचानक उलटी झाल्यान

अंत्री येथील स्वामी समर्थांना सव्वा किलो चांदीचा मुकुट अर्पण
चंदगड : चंदगड तालुक्यात स्वच्छतारूपी गांधी जयंती साजरी (Video)
लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला – डॉ. अजित नवले

बुलडाणा प्रतिनिधी –  बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथील दिलीप रामदास गोसावी वय 22 वर्ष हा घरी असतांना त्याला अचानक उलटी झाल्याने त्याला काल सायंकाळी उपचारार्थ सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी वार्ड मध्ये त्याला एक सलाईयन लावली होती. उशिरापर्यंत कुठल्याच डॉक्टरांनी त्याची तपासणी केली नाही. मृतकाच्या नातेवाईकांनी या बाबत उपस्थित डॉक्टरांना विचारपूस केली होती. यावेळी डॉक्टर इंगळे यांनी मला माहित नाही असे सांगून उडवाउडवीचे उत्तर देऊन दिलीप याच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी त्यांना काही सांगीतले नाही. त्यामुळे उपचारात डॉक्टरांनी हलगर्जीपणा करून वेळेवर उपचार न केल्याने दिलीप गोसावी यांचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतकाचा भाऊ श्रीकृष्ण गोसावी यांनी शहर पोलीस यांना केली आहे. त्यामुळे या संबंधित डॉक्टर ची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तर याबाबत कुठलीच दखल घेतली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा रुग्णसेवक सुरज यादव यांनी दिला आहे.

COMMENTS