मुंबई : मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय रुग्णालयात निवासी डॉक्टराचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौक

मुंबई : मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय रुग्णालयात निवासी डॉक्टराचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत निवासी डॉक्टरने ताप आल्याने स्वत:ला अँटिबायोटिक सलाईन लावले. मात्र, त्याचे रिअॅक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ धुमाळ असे मृत्यू झालेल्या निवासी डॉक्टराचे नाव आहे. डॉ. धुमाळ हे मूळचे परभणी जिल्ह्यातील असून सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शल्यचिकित्सा विषयाच्या दुसर्या वर्षाला शिकत होते. डॉ. धुमाळ हे गुरुवारी त्यांच्या खोलीतून बाहेर आले नाही म्हणून त्यांच्या सहकार्यांनी शोध घेतला. त्यावेळी डॉ.धुमाळ हे त्यांच्या बेडवर मृतावस्थेत पडलेले दिसले. डॉ. धुमाळ यांच्या मृतदेहाजवळ अँटिबायोटिक सलाइन आढळले. डॉ. धुमाळ हे होस्टेलच्या पाचव्या मजल्यावर राहत होते. काही दिवसांपूर्वीच ते 10दिवसांची रजा घेऊन परतले होते. मात्र, ताप आल्याने त्यांनी हॉस्टेलवरच उपचार घेण्यास सुरुवात केली. ते अँटिबायोटिक घेत असल्याची सांगण्यात येत आहे.
COMMENTS