Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारळाच्या फांदीसह विहिरीत पडलेल्या युवकाचा मृत्यू

कोरेगाव : ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील नवलाई देवी मंदर परिसरालगत चिरका नावाच्या शेतशिवारातील भंडारे यांच्या शेतीलगतच्या विहिरीत प्रतीक लक्ष्मण भांडव

आबा गट इस्लामपूर पालिका निवडणुकीत 4 प्रभाग लढविणार
सातारा पालिकेची अर्थसंकल्पीय आज होणार
म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

कोरेगाव : ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील नवलाई देवी मंदर परिसरालगत चिरका नावाच्या शेतशिवारातील भंडारे यांच्या शेतीलगतच्या विहिरीत प्रतीक लक्ष्मण भांडवले (वय 18) हा नारळाच्या झाडाच्या फांदीसह 40 फूट खोल विहिरीत पडला होता. परिसरातील नागरिकांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोरेगाव येथील चिरका नावाच्या शेतशिवारातील भंडारे यांच्या शेतीलगत असणार्‍या विहिरीत नारळाच्या झाडावरून फांदीसह 40 फूट खोल विहिरीत प्रतीक भांडवले पडला. प्रतिक विहिरीत पडल्याची माहिती त्याच्या मित्राने गावकर्‍यांना दिली. यावेळी गावच्या ग्रामस्थांनी त्या विहिरीकडे धाव घेतली. रात्री थ्रीफेज विद्युत पुरवठा बंद असल्याने गावातील युवा वर्गाने गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात शोध मोहिम सुरु केली. मात्र, अंधार असल्याने प्रतिकला शोधताना त्यांना अडथळे आले. कॅनॉलला पाणी असल्याने विहीर पाण्याने भरली होती. डिझेल इंजिनच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपासण्यात आले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विहिरीतील पाणी कमी झाल्यानंतर प्रतीक याचा मृतदेह सापडला. दोरखंडाच्या सहाय्याने त्याचा मृतदेह वर काढण्यात आला. प्रतीक हा आई-वडिलांना एकूलता एक मुलगा होता.

COMMENTS