Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्‍वानाचा मृत्यू; डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे ः शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये लसीकरणादरम्यान एका श्‍वानाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चतुश्रुंगी पोलीस ठाण

मणिपूर, मेघालयात भूकंपाचे हादरे
नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
रविंद्र मेटे यांचा प्रामाणीकपणा,सापडलेले एटीएम केले पोलीसाकडे जमा

पुणे ः शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये लसीकरणादरम्यान एका श्‍वानाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून श्‍वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वार्षिक लसीकरणासाठी आलेल्या श्‍वानाचा गळ्याचा पट्टा आवळल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला. समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेकडे लॅब्रोडोर जातीचा एक श्‍वान होता. दरवर्षी या श्‍वानाचे लसीकरण करणे गरजेचे असते. त्यानुसार त्या श्‍वानाला घेऊन पाषाण येथील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये गेल्या होत्या.

COMMENTS