अहमदनगर : जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गुरुवारी गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत पठारे बच

अहमदनगर : जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गुरुवारी गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत पठारे बचावल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. पारनेर शहरातील एका हॉटेल नजीक हा प्रकार घडला. या घटनेनंतर पाेलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र गावठी कट्ट्यातून गोळी झाडता न आल्यामुळे त्यांच्यावरील संकट टळले.
COMMENTS