झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या विषयाच्या मालिका आणत असते. भारत आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना सोबतच बऱ्यापैकी समाजात अंधश्रद्

झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या विषयाच्या मालिका आणत असते. भारत आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना सोबतच बऱ्यापैकी समाजात अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम जोरदार सुरु आहे. असाच एक विषय घेऊन ‘झी मराठी’ वर ‘दार उघड बये’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत सानिया चौधरी(Sania Chaudhary) दिसत आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगना असून ती या मालिकेत मंदिरातील संबळ वादकाची भूमिका साकारत आहे. ‘दार उघड बये’ ही नवीन मालिका १९ सप्टेंबरपासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
COMMENTS