जळगाव प्रतिनिधी - पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील शेतकरी विश्वास आनंदा पाटील यांच्या दोन एकर शेत जमिनीमध्ये ज्वारी पिकाची लागवड केली आहे.

जळगाव प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील शेतकरी विश्वास आनंदा पाटील यांच्या दोन एकर शेत जमिनीमध्ये ज्वारी पिकाची लागवड केली आहे. हे पीक काही दिवसांत काढणीस येणार होते. परंतु काल मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारीचे हे पीक सुमारे 40 ते 45 टक्के जमीनदोस्त झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी शासनातर्फे त्वरित झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
COMMENTS