Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यात सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

पळशी : स्यंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जळून खाक झालेले साहित्य. (छाया : विजय भागवत) म्हसवड / वार्ताहर : पळशी, ता. माण येथील गुलाबराव जाधव या

पावसाअभावी पिके कोमेजल्याने शेतकरी चिंतेत
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू
चांदोलीचे पर्यटन आजपासून तीन दिवस बंद

म्हसवड / वार्ताहर : पळशी, ता. माण येथील गुलाबराव जाधव यांच्या राहत्या घरात स्यंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्यासह धान्य, कपडे व कागदपत्रे जळून खाक झाली. स्फोटाच्या हादर्‍यामुळे घराची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नकसान झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली.
या दुर्घटनेत घटनेमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच माणचे नायब तहसीलदार अंकुश यवरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन आपत्तीग्रस्त कुटुंबियांना दिले.

COMMENTS